ये आयुष्याची संध्याकाळ
आठवात येई निज काळ
घडून गेले जे भले बुरे
उभे राही स्वच्छ डोळ्यांपूढे
घडल्या असतील चुका अनेक
पण नीयत होती नेहमीच नेक
येवून गेले कितीएक जीवनात
लावून गेले माया जिव्हाळा मनी
तिन्ही सांजेला संध्या समयी
संदीप्रकाशी दिसतो जीवन प्रवास
हरवले गवसले जे जे ऐसे
खंत खेद अन् आनंद मनी न मावे
दिसतो मजला पैलतीर आता
न भिवती मज संध्याछाया आता
No comments:
Post a Comment