Monday, September 23, 2019

आयुष्याचा अर्धा प्रवास, सरला की उरला।

आयुष्याचा अर्धा प्रवास, सरला की उरला। 
दूरवरच्या प्रवासी, भेटले की सुटले अनेकानेक। 

आयुष्याचा अर्धा प्रवास, सरला की उरला।
सरल्या प्रवासाची, बोच। होती की उरल्याची आस आहे उरी। 

येथपर्यंत होती साथ अनेकानेकांची। 
शेवटपर्यंत राहील का ती साथ तशीच सर्वांची। 

सुखदु:खांची अविरत प्रवाह सरिता वाहते। 
समाधानाच्या अथांग सागरा भेटू पहाते।

ही प्रवाहसरिता राहिल का अथांग वाहती वाहता। 
का होईल सागरमिलनाआधी प्रवाहपतिता। 

या प्रवासी लागले किनारे अनेकानेक। 
फोडूनी कातळ, मार्गस्थ जाहले सरिता जल सारे।  

आयुष्याच्या या अर्ध्या वाटेवरती, आजच्या या जन्मदिनी।  
आठवात येती, त्या सरलेल्या साऱ्या रात्रंदिनी। 

सुटले मागे सारे सोबती अन् सगेसोयरे।  
उरले मागे फक्त आठवणीच्या हिंदोळी।

पंढरपूरी मामांच्या माळवदावरी

पंढरपूरी मामांच्या  माळवदावरी
आकाशाच्या गोल घुमटाखाली

सतरंजीच्या बिछान्यावर पहूडता दिसले जे लाखो तारे
तेव्हाच झाली सा‌ऱ्या नक्षत्रांची ओळख खरी

मृग चित्रा स्वाति अन सर्प्तशी
धृवतारा एकटाच चमके उत्तरी

पांडूरंगाच्या मंदिराचे आहे पूर्वेस महाद्वार
नक्षत्रांच्या पूर्वपश्र्चिम प्रवासाचे कळले महाद्वार

लक्ष्मी-नारायणच्या गच्चीवर टेकता पाठ
क्षितिजे दिसत होती चारीठाव

उगवत्या पौर्णिमेच्या चंद्रावरचा ससा
वाटत होता खरा जसा

गलतही करते है...


हम जो भी करते है।
गलतही करते है।

जब भी करते है।
गलतही करते है ।

हम जो नही भी करते है
गलतही करते है।

हम करे तो भी गलत।
ना करे तो भी गलत।

करने की चाह रखकर भी
ना करने की राह चलते है।

हम जो भी करते है।
गलतही करते है।

माझी आई...


 माझी आई
प्रेमाची घागर
मायेचा सागर

माझी आई
वात्सल्याचे आगर
करूणेचा सागर

माझी आई
प्रेमाचा पाझर
वात्सल्याचा पदर

माझी आई
भक्तीचा उमाळा
शक्तीचा धांडोळा

माझी आई
उत्साहाचा झरा
चैतन्याचा गाभारा

माझी आई
आचरी नित्य सदाचारा
दिनदूबळ्यांचा आसरा

माझी आई....

तिचे लाडके लेकरू
सुनील...

जगवावं का जागवावं ...

जगवावं का जागवावं ...

जगावं का एक दिवस
स्वत: स्वत:साठी साऱ्या जगाला विसरून

जगावं का एक दिवस
सारी बंधनं, सारी नाती विसरून

जगावं का एक दिवस
आपल्यातलं मुल जागवून

जगावं का एक दिवस
स्वत:चे न जगलेले क्षण जगून

जगावं का एक दिवस
का? कशासाठी? प्रश्र्न सारे विसरून

जगावं का एक दिवस
आपुले आपण आपलेची बनून

जगावं का एक दिवस
आत्मानंदी टाळी लावून

जगावं का एक दिवस
फक्त मी आणि मीच बनून

जगवावं का जागवावं एक दिवस
मला अन् माझ्यातल्या ‘मी’पणाला