कधी उजेड कधी अंधार
बाहेरच जग अनभिज्ञ
कधी झोप कधी जाग
हलते गाडी खाली वर
चालू रहाते प्रवाशांची ये जा
येता स्थानक चढ उतर
रात्रीच्या प्रवासात सारे अनभिज्ञ
कोण आपला कोण परकं
हिच गंमत आयुष्याच्या प्रवासाचीही
पांथस्थ क्षणभरात येतीजाती
कुणी ओळखी कुणी अनोळखी
कधी जाग कधी झोप
चाले आयुष्य खालीवर
साऱ्या पांथस्थांची साथ क्षणभर
येता गंतव्य स्थान जाई उतरून
दोन क्षण सहवासाचे दोन शब्द आपुलकीचे
क्षणभराची साथ कशास हवे हेवे दावे
विसरून जावे आले गेले
उतरून जावे येता आपले गंतव्य स्थान
…. प्रवासी सुनील
No comments:
Post a Comment