Friday, November 8, 2019

कल क्या होगा?

कल क्या होगा किसको पता।
फिर भी जी अंजानेसे घबराता ।

जो भी होगा सही होगा अच्छाही होगा ।
उपरवालेने अपनेलिए कुछ अच्छाही सोचा होगा ।

जानकर भी अंजानेसे लगता है क्यूॅं डर।
भरौसा रख ए दिल
खूदपर और खूदापर।

जिसका कोई नही उसका
खूदा है।
जानकर भी ये दिल अंजान है।

जगवावे वा जागवावे...

मी का द्यावे या देहाकडे लक्ष
जर का तो होणार आहे नष्ट

येथे सारेच अश्वाशत, चंद्र सूर्य तारे
मी का धरावा मोह देहाचा मारे

होतील आज ना ऊद्या माझी गलितगात्र
मी का समजावे मज अजरअमर मात्र

या देहाचा बोलविता धनी वेगळाच कोणी
मज वाटे मीच माझा बोलतो वाणी

हा देहही त्याचा हे विचारही त्याचे
त्याचे त्याने ठरवावे जगवावे वा जागवावे

कळेना जीवास...

कळेना जीवास दिनानाथा तुझी रचना
चालवीसी हाती धरोनीया आम्हा पामरा

कधी कडे घेऊनीया आम्हा पामरा
पार करवीसी दिनानाथा कडेकपारा

न दिसे डोळा देवा तुझा अंत पाड
नेत्र माझे जणू झालेसे अंध

तुच घाली नेत्री माझ्या अंजन
तेवी व्हावे मज चर्तुभूज दर्शन

चिंता उद्याची सतावीतसे मना
तुच हरावी चिंता दिनानाथा

कळेना जीवास दिनानाथा तुझी रचना
शरण तुज  आता आलो दिनानाथा

....स्वामी खडकानंद

अपनी ज़िंदगी ...

कहते है अपनी ज़िंदगी अपनी होती है।
पर सचमें ज़िंदगी अपनी अपनोंसे जुड़ी होती है।

अपनी ज़िंदगी अपने ख़्वाबोंसे बनती है।
अपनी ज़िंदगी अपनोंके ख़्वाबोंसे पनपती है।

अपनें अपनें पास ना हो तो अपनी ज़िंदगी अपनी
न होती है।
अपनें आसपास हो तो
अपनी ज़िंदगीमें अपनापन होता है।

अपनी ज़िंदगी अपनों के ख़्वाबों को पूरा करने गुज़रती है।
अपनी ज़िंदगी अपनों के चेहरों की मुस्कानसे सुलगती है।

ख़्वाब अपनों के पुरे करनें में गुज़रती है जब अपनी ज़िंदगी।
आधीअधूरीसी ज़िंदगी अपनी पूरी पूरीसी लगने लगती है ज़िंदगी।

चंद्र पूनवेचा...

खिडकीत त्या बैसोनिया मी सदा
पूनवेचा चंद्र तो नजरेत साठवावा

शुभ्र धवल ढगांच्या त्या तलम पडद्या मागूनी
पूर्णचंद्र तो दिसावा लाजलाजूनी तयाने व्हावे गुलाबी

ती शुक्राची नाजूक चांदणी त्याच्यासवे तेथे
होता पिधान तेधवा व्हावे मिलन तयांचे

तो चंद्रमा ती शुक्राची चांदणी अवघे गगन प्रकाशी
तो शांत शितल प्रकाश तयांचा अंतरास शांतवी

असेन पून्हा पून्हा तेथेच त्या खिडकीसमीप मीही
असेल तो चंद्रमा अन् ती चांदणीही पूनवेस त्या क्षितीजी

व्हावे दर्शन क्षितीजी त्या द्वयांचे पून्हा पून्हा
तिमीर अंतरीचा दर्शने तयांच्या निमिषर्धात दूर व्हावा

चंद्रमौळी झोपडी...

दिवेलागणीस लागता दिवा उजळे दशदिशा।
उजळतां दशदिशा दूर होती अंधारवाटा।।

घरामध्ये दिवा लागता नवा।
उजेड पडला भिंतींवरी दशदिशा ।।

ती चिमणीच होती दिसत बरी।
झाकल्या होत्या भिंतीवरल्या पोपडी।।

उजेडात येई दिशा दिव्याच्या प्रकाशी जशा।
दृष्टीस येई घराघराची दारीद्र्याची दशा।।

तो तिमरची बरा, नकोच ते प्रकाशणे दशदिशा।
झाकली मूठ सव्वालाखाची नको दिसाया दशा।।

गरिबाची ती प्रिय अशी चंद्रमौळी झोपडी।
चिमणीच्या प्रकाशातही वाटतसे महाल बावन्नखणी।।

साथ...

शब्द असो तव प्रमाचे वा रागाचे
ऐकावया मम कान आतुरले सदाचे

तुजवीण क्षणही मज भासे युगांचे
तव सहवासी युगही मज भासे क्षणांचे

म्हणती साथ पतीपत्नींची साता जन्मांची
मज भासे ती युगा युगांची

नकोच मज मुक्ती जन्माजन्मांची
घेईन जन्म मी युगेयुगे तुजसाठी

अविरत मंथन...

मनात चाले विचारांचे अविरत मंथन।
भाव भावनांचे चाले अविरत चिंतन।

चितनांतून होई भावनांना शब्दांचे कोंदण।
शब्दांना मग होई अलंकारांचे लिंपण।

त्या लिंपणातून घडे शब्दालंकरांची चौदा रत्ने।
त्या रत्नांतून मग होते कवितांचे रचणे।

त्या साऱ्यातून मग होई चित्तात अमृत शिंपण।
ते लेखणीतून होई कार्व्यापण।

विचारी मना...

विचारी मना तूच शोधूनी पाहे
विचारांचा अंत, मध्य अन सुरूवात कोठे

मारता विचारांच्या डोहात डुबकी
हातास येती अनेक भावमोती

अंधार अन् तो प्रकाश विचारांतच आहे
शोध अंतरीचा विचारातूनच आहे

विचारां विचारांत एक बंध आहे
विचारांविना विचार बेबंध आहे

विचारांविना मन ते रिक्त आहे
रिक्त मनीही विचार व्यक्त आहे

विचारी विचारी मन दंग आहे
विचारांविना मन दूभंग आहे

विचारी मना तूच शोधूनी पाहे
विचारांविना तव अंत आहे

भेट स्वत:ची स्वत:शी...

स्वत: स्वत:ला भेटायचं राहुन जातं कायम
इतरांच्या भेटीगाठींत हरवून जातो कायम

स्वत: स्वत:ला भेटायचं राहुन जातं कायम
इतरांच्या आठवणीत रमून जातो कायम

स्वत: स्वत:ला भेटायचं राहुन जातं कायम
इतरांसाठी जगताना स्वत:साठी जगायचं राहून जातं कायम

स्वत: स्वत:ला भेटायचं राहुन जातं कायम
रामरगाड्यामध्ये स्वत:ला आठवायचं राहून जातं कायम

चार क्षण स्वत: साठी जगापासून राहून लांब
पहावं निरखून लांबून सारं जग

स्वत: स्वत:ला भेटायचं राहुन जातं कायम...

आर्त माझे मनीचे...

शब्दावीण माझे मनीचे आर्त तुज कळावे।
हे दिनानाथा मज प्रत्यक्ष दर्शन ते द्यावे।

तुज आळविता आळविता ते कळवळ्याने।
माझे आळविणे ते तुज सहज कळावे।

हे वैकुंठीच्या राणा, हे कृपाळू करुणाकरा।
कृपा मजवरी करा आपुले मजसी करा।

माझे तुझे रूप एक आत्मा तो एक।
ऐसे असता ते मज भासावे का द्वैत।

परमात्म्यात व्हावे विलिन हे आत्मरूप।
निजधामासी जावे होऊनी परमात्मरूप।

...स्वामी खडकानंद

Monday, September 23, 2019

आयुष्याचा अर्धा प्रवास, सरला की उरला।

आयुष्याचा अर्धा प्रवास, सरला की उरला। 
दूरवरच्या प्रवासी, भेटले की सुटले अनेकानेक। 

आयुष्याचा अर्धा प्रवास, सरला की उरला।
सरल्या प्रवासाची, बोच। होती की उरल्याची आस आहे उरी। 

येथपर्यंत होती साथ अनेकानेकांची। 
शेवटपर्यंत राहील का ती साथ तशीच सर्वांची। 

सुखदु:खांची अविरत प्रवाह सरिता वाहते। 
समाधानाच्या अथांग सागरा भेटू पहाते।

ही प्रवाहसरिता राहिल का अथांग वाहती वाहता। 
का होईल सागरमिलनाआधी प्रवाहपतिता। 

या प्रवासी लागले किनारे अनेकानेक। 
फोडूनी कातळ, मार्गस्थ जाहले सरिता जल सारे।  

आयुष्याच्या या अर्ध्या वाटेवरती, आजच्या या जन्मदिनी।  
आठवात येती, त्या सरलेल्या साऱ्या रात्रंदिनी। 

सुटले मागे सारे सोबती अन् सगेसोयरे।  
उरले मागे फक्त आठवणीच्या हिंदोळी।

पंढरपूरी मामांच्या माळवदावरी

पंढरपूरी मामांच्या  माळवदावरी
आकाशाच्या गोल घुमटाखाली

सतरंजीच्या बिछान्यावर पहूडता दिसले जे लाखो तारे
तेव्हाच झाली सा‌ऱ्या नक्षत्रांची ओळख खरी

मृग चित्रा स्वाति अन सर्प्तशी
धृवतारा एकटाच चमके उत्तरी

पांडूरंगाच्या मंदिराचे आहे पूर्वेस महाद्वार
नक्षत्रांच्या पूर्वपश्र्चिम प्रवासाचे कळले महाद्वार

लक्ष्मी-नारायणच्या गच्चीवर टेकता पाठ
क्षितिजे दिसत होती चारीठाव

उगवत्या पौर्णिमेच्या चंद्रावरचा ससा
वाटत होता खरा जसा

गलतही करते है...


हम जो भी करते है।
गलतही करते है।

जब भी करते है।
गलतही करते है ।

हम जो नही भी करते है
गलतही करते है।

हम करे तो भी गलत।
ना करे तो भी गलत।

करने की चाह रखकर भी
ना करने की राह चलते है।

हम जो भी करते है।
गलतही करते है।

माझी आई...


 माझी आई
प्रेमाची घागर
मायेचा सागर

माझी आई
वात्सल्याचे आगर
करूणेचा सागर

माझी आई
प्रेमाचा पाझर
वात्सल्याचा पदर

माझी आई
भक्तीचा उमाळा
शक्तीचा धांडोळा

माझी आई
उत्साहाचा झरा
चैतन्याचा गाभारा

माझी आई
आचरी नित्य सदाचारा
दिनदूबळ्यांचा आसरा

माझी आई....

तिचे लाडके लेकरू
सुनील...

जगवावं का जागवावं ...

जगवावं का जागवावं ...

जगावं का एक दिवस
स्वत: स्वत:साठी साऱ्या जगाला विसरून

जगावं का एक दिवस
सारी बंधनं, सारी नाती विसरून

जगावं का एक दिवस
आपल्यातलं मुल जागवून

जगावं का एक दिवस
स्वत:चे न जगलेले क्षण जगून

जगावं का एक दिवस
का? कशासाठी? प्रश्र्न सारे विसरून

जगावं का एक दिवस
आपुले आपण आपलेची बनून

जगावं का एक दिवस
आत्मानंदी टाळी लावून

जगावं का एक दिवस
फक्त मी आणि मीच बनून

जगवावं का जागवावं एक दिवस
मला अन् माझ्यातल्या ‘मी’पणाला

Friday, August 23, 2019

यकिन...

खुदपर यकिन हो ना हो
पर खुदापर यकिन जरूर हो 

चाहे ते साथ दे या ना दे 
पार उसका साथ हरपल रहे 

राह में आये कीर्तनी कठीणाईयाँ 
सही राह मुझे वोही दिखाऍ 

निगहो में मंझिल नजर ना आयें 
फिर भी मंझिल तक वोही पहुंचाये

गर कदम चालनेमें हो जाये मजबूर 
वोही गोदमे उठाकर पार लगाये 

खुदपर यकिन हो ना हो
पर खुदापर यकिन जरूर हो 

कुछ मनकी बांते...

लिखी है हेमने कुछ मनकी बांते
कुछ सच्ची, कुछ अच्छी

लिखी है हेमने कुछ मनकी बांते
कुछ खट्टी, कुछ मिठी

लिखी है हेमने कुछ मनकी बांते
कुछ सही, कुछ गलत

लिखी है हेमने कुछ मनकी बांते
कुछ अपनी, कुछ अपनोंकी

लिखी है हेमने कुछ मनकी बांते
कुछ सापाने, कुछ हकीकत

लिखी है हेमने कुछ मनकी बांते .... 

Thursday, August 22, 2019

दर्शन

आला होता तो स्वप्नी माझीया
दिधले तयाने दर्शन मजला

बोलला नच तो नजसी काही
नुसतेच तयाने केले स्मित त्याने

परि भासले मज ते स्मित अर्थवाही
भाव तयाच्या नेत्रामधले, तेही अर्थवाही

तो बोलला इतुकेच मजसी
का शोधसी मंदिरी मजसी

मी वसतसे तव अंतरी
पहा डोकावूनी स्वअंतरी

दिसेन मी तूज तेथे
आलास जरी तू येथे

पाहशील मज तू कैसे
मूर्तित नच मी तव अंतरी

तो बोलला इतुकेच मजसी
ऐसे भासले मज स्मितामधूनी तयाच्या

शाळेचा पहिला दिवस...

तसा कोणालाच आठवत नाही शाळेचा पहिला दिवस।
जेव्हा होतो आईचा हात सोडून नव्या जगात प्रवेश।।

वर्ग नवा, मित्र नवे, सारेच असते नवे नवे।
कळण्याचे हे सारे नसते वय हेच खरे।।

हात सोडून आपला जेव्हा पाठी वळते आई।
भोकाड पसरून डोळ्यातून वाहू लागतो आश्रुंचा पूर।।

होते डोळ्यांमध्ये आसवांची दाटी, नजर शोधे माऊली कोठे।
याआधी कधीच सुटले नव्हते तिचे बोट, अन् तिची साऊली।।

शाळेचा पहिला दिवस सर्वांसाठी बहुतेक असतो असाच।
जो कधी नसतो स्मरणात, तरी मनातून जाता नाही जात।।

बोलविता धनी

मी का द्यावे या देहाकडे लक्ष
जर का तो होणार आहे नष्ट

येथे सारेच अश्वाशत, चंद्र सूर्य तारे
मी का धरावा मोह देहाचा मारे

होतील आज ना ऊद्या माझी गलितगात्र
मी का समजावे मज अजरअमर मात्र

या देहाचा बोलविता धनी वेगळाच कोणी
मज वाटे मीच माझा बोलतो वाणी

हा देहही त्याचा हे विचारही त्याचे
त्याचे त्याने ठरवावे जगवावे वा जागवावे

Saturday, August 10, 2019

हे असे का होते?

हे असे का होते, ते सांगता नच येते
एकमेकांच्या सहवासाची सवय होत जाते

तुझे ते आजूबाजूस असणे, ते सारखे वावरणे
मनाला बोचते की आवडते, ते समजेनासे होते

तू असलीस काय? अन् नसलीस काय?
फरक काही पडत नाय फरक काही पडत नाय

कारण, तुझी सय, तू असीलीस अन् नसलीस तरी
पण सरत नाय सरत नाय

उगाच स्वत:ला गुंतवण्याचे करावे नाटक
पण पहिल्याच प्रयोगात फसावे ते नाटक

तू तिथे अन् मी इथे दोघे दोन ध्रुवावर
पण तेथूनही दिसे उत्तरेला तो ध्रुव तारा

त्या ताऱ्याच्या मग अंधुक प्रकाशात
मज दिसे तव परतीच्या प्रकाशवाटा स्पष्ट

तूज साठीचे जगणे होते जेव्हा
तूजवीण जगणे, होते असह्य तेव्हा

तिमीरात प्रकाशातच्या वाटा बुडून जाती जेव्हा
एक तूझी तेज शलाका पुसून टाकी अंधार सारा

माझ्याच अस्तित्वाला जेव्हा लागते प्रश्र्नचिन्ह
तेव्हा अस्तित्वच तुझे होते उत्तर त्या प्रश्र्नचिन्हा

तूजवीण मी शुन्य, शुन्न्यात हरवून जातो
तूजसाठी मी शुन्न्यात नजर रोखून जातो

विरहात सुखाला येते किंमत सहवासाची
सहवासी असतां येते दू:खाला झालर सुखाची

मी होतो केव्हा माझा, माझेच मला ना आठवे
अस्तित्व ते माझे तूजवीण शुन्यवत ते भासे

विरहात तूझ्या ग साजणी, गाऊ किती मी विरहणी
भासतात ते दिन-राती मज युगे तूजवीण साजणी

आज काही अनयचा होता वेगळाच मूड....

आज काही अनयचा होता वेगळाच मूड
म्हणत होता सुनीलकाका आहेत माझे फ्रेंड

म्हणत होता सुनीलकाका  आवडतात खूप
गळाभेट अन् पाप्यांचा करत होता वर्षाव खूप

खेळता खेळता फूटबाॅल,  पडत होता गळा
मांडीवरून उठण्याचं घेत नव्हता नाव

शाळेतून म्हणे थेट येतो तुमच्या घरी
आजोळला देऊन टाकू आजपासून सूट्टी

आज काही अनयचा होता वेगळाच मूड....

अनय...

माझे हे बोलणे कवतुकाचे
संपेल ना कधीही हे बोल कवतुकाचे

लडिवाळ चाळे जैसे अनय बाळाचे
तैसेच माझे हे बोल कवतुकाचे

तैसा आहे हट्टी तो बाळ
परी ऐकी सारे जाता समजाऊ

त्यासवे खेळावे होऊनीया मूल
द्यावे तया स्वातंत्र्य करण्या मनीचे

रागे न भरावे कधीही त्या बाळा
कौतुके सहज समजवावे बाळा

अनय...
भलताच गोड आहे हो हा छोकरा!

सुनील काका

आठवणींची सरमिसळ ....

आज स्वप्नी पहाटे माझ्या  आल्या सासूबाई
कुठले घर, कुठले दार कळले नाही काई

छोटा मयूर, मोठा मयूर फरक कळला नाही
काळ वेळ साऱ्यांची सरमिसळ झाली ठाई

चहाऐवजी हातामधी आली डोसा अन् चटणी
वेळ जेव्हा आली पिण्याची पाणी

कळले मज तेव्हा आई नाहित त्या ठाई
तेव्हा मात्र गळा पडून मयूरच्या रडता जाग आली घाई

अजूनही स्मरणमधून जात नाही काही
आठवणींची सरमिसळ संपत नाही

....सुनील

अंजान...

कल क्या होगा किसको पता।
फिर भी जी अंजानेसे घबराता ।

जो भी होगा सही होगा अच्छाही होगा ।
उपरवालेने अपनेलिए कुछ अच्छाही सोचा होगा ।

जानकर भी अंजानेसे लगता है क्यूॅं डर।
भरौसा रख ए दिल
खूदपर और खूदापर।

जिसका कोई नही उसका
खूदा है।
जानकर भी ये दिल अंजान है।

माते तव मायेचे पारखे एक लेकरु ...

डॉक्टरांच्या भाषेत कार्डिआक आरेस्ट
आमच्या भाषेत मी नाही जा

इतुक्या वर्षांचीअहर्नीश सेवा
कधी न पडला कधी त्यात  खंड

आंजिओप्लास्टि, बायपास वा व्हॉल रिप्ल्समेंट
साऱ्यांना देऊन तोंड अखंड राहिली धड धड

जरी न उरली पूर्वीइतकी शक्ती
तरी राहिली धडधडीची उर्मी

आज अचानक कायासे घडले
की थांबून सारी ऊर्जा धडधडणे ते थांबले

आजून थोडेसे केले असते सायास
तर थांबला नसता येथला प्रवास

तव सहवासाची अविरत छाया
मिळाली असती आम्हा अविरत माया

माते तव मायेचे पारखे एक लेकरु ... सुनील
(.... सासूबाई सौ. चित्रा यार्दी यांच्या निधनानंतर लिहिलेली कविता (१३ जुलै २०१९))

आर्शिवाद ईच्छुक

खडकालाही कधी कधी पाझर फुटतो
लोकांना तो जिवंत झरा वाटतो

त्या पाण्याची ती अविट गोडी
भल्या भल्यांची तहान भागवी

मायेचा हा झरा वाहता अटेल ना कधीही
थांबला जरी पाऊस पाणी

भरभरून घ्याव्या घागरीवर घागरी साऱ्या
भर त्या ओहळाचा अटेल ना न्यारा

दूरूनही हा मायेचा पाझर ओला
करत राहील सर्वांना चिंब ओला

स्पर्श जरी आता दृश्य हातांचा झाला नाही डोईवरी
अदृश्य स्पर्श आर्शिवादाचा राहील सदैव डोईवरी

आर्शिवाद ईच्छुक
... सुनील
(.... सासूबाई सौ. चित्रा यार्दी यांच्या निधनानंतर लिहिलेली कविता (१३ जुलै २०१९))

नेहमीच जेष्ठ (शिष्ठ) जावई ..... सुनीलराव

मी टेकेन दारातल्याच खूर्चीवर...

आई म्हणतील, चहा टाकलाय, घेऊन जा

सत्तावीस वर्षांपूर्वीच्या चहाची चव काही न्यारीच

आताही मी टेकतो दारातल्याच सोफ्यावर
आणि आई चहा करा सांगतो हक्काने

पण, आता ही चहाची तलफ भागवेल कोण त्याच सोफ्यावर

दारावरची मी वाजवतां बेल उघडेल कोण दारा

नेहमीची ओळखीची हासरी नजर दिसेल का पून्हा

सासू-जावयाच्या या नात्याची सर येईल का अनुभवा पून्हा

मायेचा हा पान्हा झाला अदृश्य जरी खरा
तरी मनाच्या गाभाऱ्यातून
पूसला जाईल का खरा

सुनील म्हणे या नात्याला सर नाही कशाची
जन्मोजन्मी हे रेशीमबंध तुटणार नाहीत कधीही

नेहमीच जेष्ठ (शिष्ठ) जावई ..... सुनीलराव
.... सासूबाई सौ. चित्रा यार्दी यांच्या निधनानंतर लिहिलेली कविता (१३ जुलै २०१९)

युगे युगे मी तव सहचारी..


होतो मी भगवंता युगे युगे तव सहचारी।
तुजवीण मी नव्हतो मी तव दशावतारी।

तव मस्यावतारी, मी होतो तव सहचारी।
तव कूर्मावतरी, मी होतो मेरूचा रहवासी।

तव वारहावतारी, मी होतो तव उच्छवासी।
तव नारसिंहावतारी, मी होतो साक्षीसी

तव वामनावतारी, मी होतो तव दर्शनार्थी।
तव परशुरामावतारी, मी होतो प्रार्थनार्थी।

तव रामावतारी, मी होतो शरयुतीरी।
तव कृष्णावतारी, मी होतो गोप गोकुळी।

तव बुद्धावतारी, मी होतो तव चाकर महाली।
तव कलीवतारी, मी असेन  तव सहकारी।

तव हर अवतारी मीही अवतरेन अनेक रुपी।
तुच देशी मज आकार भुतली या देहरुपी।

मी तुजवीण कधी नव्हतो या भूतली
तूजवीण मी कधी न येईन या भूतली

पैसे टाकले की सगळं मिळतं?

पैसे टाकले की सगळं मिळतं
पुरणपोळी, शिरापुरी, बासुंदी सगळंच मिळतं

पण मिळेल कशी समाधानाची पावती
अन् मिळेल कशी आईच्या वात्सल्याची गोडी

पैसा टाकला की सगळंच मिळतं
गाडी, बंगाला ऐषोराम सगळंच मिळतं

पण सुख समाधान आनंद होईल द्विगुणीत?
पैशाला येईल का घामाचा सुगंध?

पैसा टाकला की हाॅटेलची रूम मिळेल ए.सी.
पण घरातल्या पंख्याखाली येणाऱ्या घामाची सर नाही

पैसा टाकल की सगळंच मिळतं
सुख समाधान आनंद
सगळंच विकत घेतां येतं?

परिचय

परिचय

कौन है हम, क्या है हमारा परिचय ।
इन्सान है या और कोई है हमारा परिचय ।

न जाने खूदसे कब होगा हमारा परिचय ।
औरोंसे माॅंगते फिरते है उनका परिचय ।

हो जायें चाहें सारे जहाॅं का परिचय
पर क्या हो सकेगा खूदका खूदसे परिचय।

भगवान का तो पता नही हो पाये परिचय ।
लेकिन जिंदगी रहते हो जाये खूद का खूदसे परिचय ।

प्रश्र्नचिन्ह...

प्रश्र्नचिन्ह...

जिथे लागतं अस्तित्वालाच माझ्या प्रश्र्नचिन्ह
तिथे अस्तित्वच माझं होत शुन्य

कायसे झालासे देह हा अवर्तिण
सायासे न कळे कारण

कारणांचा घेऊ जाता धांडोळा
येई जीवीसी शिणवटा

जाऊ वाटे शरण भगवंता
परी न दिसे तव चरण अनंता

तुच दावी मज वाट आता
न होई सहन तव विरह आता

तुझ्या अस्तित्वास लागेल मग प्रश्र्नचिन्ह
न दिसतां मज तव चरणचिन्ह

या साऱ्यावर ईलाज नाही माझ्याकडे

आताशा मला समजायला लागलयं हळूहळू ....
कि या साऱ्यावर ईलाज नाही माझ्याकडे

इतरां समजून घेणे नि विसरून जाणे
सोपे नाहीच वाटते तितके

मना मनांत दाटून येतां निराशा
मग काय करावी दुजांकडून अपेक्षा

मनामध्ये खदखदा ज्वालामुखी, स्फोट होईल त्याचा कधी
स्वत: बरोबर साऱ्या जगाला जाळील कधी

मी संतही नाही, अन् पंतही नाही
जगाच्या चुकांवर पांघरूण घालायला

मीच साऱ्या जगाला समजून घेण्याचा का घ्यावा ठेका
कधी तरी समोरच्याने सोडावा आपला हेका

इतरांच्याच मनासारखे वागून सारखं
जग म्हणतं हा करतो आपलेच खरं

आताशा मला समजायला लागलयं हळूहळू ....
कि या साऱ्यावर ईलाज नाही माझ्याकडे

पंढरीस जाता....

पंढरीस जाता जाहल्या आठवणी जाग्या
पांडूरंगाच्या मंदिरी केल्या   कित्येक वाऱ्या

चंद्रभागेमध्ये मारील्या डुबक्या कित्येक
जन्मजन्मांतरीची पापे वारीली अनेक

मामाच्या गावाला जाऊ या
रोजरोज पोळशिकरण खाऊ या

विठ्ठल हरी तो पंढरीचा उभा विटेवरी
हरी विठ्ठल तो पंढरीचा झाला वैकुंठवासी

रया गेलीसे वाटे साऱ्या पंढरीची
पांडूरंगही जणू गेलासे परतुनी वैकुंठी

फिरून यावे माघारी असे मज वाटे
पांडूरंग अन् हरी विठ्ठल बरवे

पंढरीस जाता आता सुख न ऊरले
 सुनील म्हणे आता पुन्हा नाही परतुन येणे

Thursday, March 28, 2019

तुजवीण अनंता....

विश्वासून तुजवर ठेविला भार अनंता
नेशील मज तूच पार नाही चिंता अनंता 

स्मरणी सदा मम चरण तव अनंता 
नयनी सदा दिसे मज तव रूप अनंता 

मम जीवासी लागेलसे घोर अनंता 
तुजवीण नाही त्राता मज अनंता 

घेई मज उचलुनी कडेवरी अनंता 
चालण्याचा हा भार सोसवेना अनंता 

दावशील तूच मज पार अनंता 
तुजवीण नाच मिळेल मज मोक्ष अनंता 

अनामिका


तुम तो हो अंजानी सी
फिर भी जानी पहचानी सी

मेरे हर सांस में बसी सी
फिर भी मुझसे अंजान सी

न नाम है कोई, न पहचान है कोई
फिर भी लागती हो अपनी सी

हर रुपमें मेरे दिलमें बसीसी
तुमही हो मेरी आत्मा अनामिका सी

मेरे रुप रंग का तो नाम हॆ कोई
पर रुह मेरी हर युगमें है अनामिका 

आपणची व्हावे गुरू आपुला।


आपणची करावा उद्धार आपुला।
खचू नये कधीही, अधोगतीस नेऊ नये।

आपणची बंधु,मित्र,सखा आपुला।
आपणची विनाशक रिपु आपुला।

आपणची साधावे हित आपुले।
आपणची करावे अहित आपुले।

आपणची करावा घात आपुला।
आपणची व्हावे गुरू आपुला।

Sunday, January 6, 2019

ते माझे सांगाती.....

ते माझे सांगाती.....

शब्दात माझ्या मीच असतो
शब्दावीण मी माझाही नसतो

शब्दा शब्दांतून प्रेम सार्थ
प्रेमावीण शब्द शब्द व्यर्थ

शब्दा शब्दाला भाव असतो
भावावीण शब्द शब्दही नसतो

शब्दा शब्दाने राग वाढतो
रागावीण शब्द शब्द न काढतो

शब्दा शब्दांनी काव्य बनते
काव्यावीण शब्द शब्द न कळते

शब्द,रूप,रस,गंध ही किमया निसर्गाची
जेथे जातो तेथे ते माझे सांगाती

न जाणे .....

न जाणे आत खोल आपण काय काय साठवतो।
मनाच्या कोपऱ्यात राग द्वेष मत्साराचा कचरा साठवतो।

न जाणे आत खोल आपण काय काय साठवतो।
मनाच्या भिंतींवर विचारांचे थरावर थर साचवतो।

न जाणे आत खोल आपण काय काय साठवतो।
कधी समष्टीसाठी मनाला मारतो अन् दूसऱ्यांसाठी जगतो।

न जाणे आत खोल आपण काय काय साठवतो।
इतरांसाठी जगतो म्हणताना इतरांच्या भावना पायदळी तुडवतो।

स्वत:साठी जगतो तो मर्त्य मानव ठरतो।
अन् समष्टीसाठी जगतो तो संत होऊन जगी ऊरतो।

न जाणे आत खोल आपण काय काय साठवतो?.......

तोची खरा भग्वदभक्त

जयांचे स्मरणी असती भगवंत
ते नर असती भाग्यवंत

जयांचे मनी असती भगवंत
ते नरच असती भगवंत

मनी वसता जर भगवंत
वसेल तेथे कैसा विकार

मन, मद-मोहमत्सराचे माहेर
तेथे भगवंताचे स्थान बाहेर

जगी जे जे भेटते भूत
त्यास मानीजे भगवंत

ऐसी जयाची मती स्थिर
तोची खरा भग्वदभक्त

आठवणीच्या हिंदोळी

आयुष्याचा अर्धा प्रवास, सरला की उरला। 
दूरवरच्या प्रवासी, भेटले की सुटले अनेकानेक। 

आयुष्याचा अर्धा प्रवास, सरला की उरला।
सरल्या प्रवासाची, बोच। होती की उरल्याची आस आहे उरी। 

येथपर्यंत होती साथ अनेकानेकांची। 
शेवटपर्यंत राहील का ती साथ तशीच सर्वांची। 

सुखदु:खांची अविरत प्रवाह सरिता वाहते। 
समाधानाच्या अथांग सागरा भेटू पहाते।

ही प्रवाहसरिता राहिल का अथांग वाहती वाहता। 
का होईल सागरमिलनाआधी प्रवाहपतिता। 

या प्रवासी लागले किनारे अनेकानेक। 
फोडूनी कातळ, मार्गस्थ जाहले सरिता जल सारे।  

आयुष्याच्या या अर्ध्या वाटेवरती, आजच्या या जन्मदिनी।  
आठवात येती, त्या सरलेल्या साऱ्या रात्रंदिनी। 

सुटले मागे सारे सोबती अन् सगेसोयरे।  
उरले मागे फक्त आठवणीच्या हिंदोळी।

नेशील पार मज तूच अनंता

विश्र्वासून तूजवर ठेविला भार अनंता
नेशील पार मज तूच अनंता

स्मरणी राहो सदा तूझे चरण अनंता
नयनी सदा राहो रुप तूझे अनंता

मम जीवासी लागलासे घोर अनंता
तूजवीण मज नाही कोणी त्राता अनंता

ठेवीन मस्तक तव चरणांवरी अनंता
परी न दिसे मज तव चरण अनंता

घेई मज कडेवरी आता अनंता
चालण्याचा हा त्रास सोसवेना अनंता

तूच मज पार नेशिल अनंता
तूजवीण न मिळेल मोक्ष अनंता

‘पुणेयामधे काय उणे?’

जुने सारे रस्ते आता राहिले नाहित तसे।
डांबराच्या जागी सिमेंट पक्क झाले जसे।।

जून्या साऱ्या खाणाखूणा मिटल्यात जणू।
कि नव्या साऱ्या इमल्यांनी झाकल्यात म्हणू।।

आता नावेही साऱ्या रस्त्यांची राहिली नाही तशी।
लालबहाद्दूर शास्त्री मार्गाचा LBS रोड झाला तशी।।

अप्पा बळवंत चौकाचा झाला ABC चौक।
चौकांतले रस्ते झाले वाहनांनी चोक।।

पुण्याची माणसे अन् वाडे लयास गेली सारी।
अन् पुणेरी बाण्याची रया गेली सारी।।

‘पुण्यामधे काय उणे?’ म्हणत होते सारे।
पण पुण्यामधून झालं आहे जणू पुणेच उणे।।

प्रस्थान

जवळची नाती सारी दूरावती
दूरची नाती जवळ येती

सुटले सारे घरदार अन् सगेसोयरे
मोकळे झाले बंध सारे

होत्याचे ते नव्हते होता
कळीकाळाचे ही काळीज हले

तोडून क्षणात बंधपाश सारे
घडे जीवात्म्याचे प्रस्थान खरे

‘ईमर्जन्सी एक्झीट’

क्युॅं ली उन्होंने जिंदगी से ‘ईमर्जन्सी एक्झीट’
रहें थे और कुछ पल जीने की बाकी

ना कोई लगी थी आग कही
ना था आया था भूचाल कही

फिर भी वो चले गये बीन बताये
बाते आधीअधूरी छोड गये

पिछे अपने छोड गये यॉंदे
बितें दिनोंकी सुनहरी यॉंदे

बातोंमें होंगी उनकीही बातें
न भूलेंगी कभी उनकी मुलाकातें

याद उनकी न जायेगी दिलसे कभी
न भूलेगा दिल उनको कभी

आपणाला अचानक सोडून गेलेल्या सर्वांना समर्पित 

शब्दप्रभू

आम्ही आम्ही सरस्वतीचे उपासक 
शब्द शब्द असती आमचे दास 

राहती तसे उभे हात जोडुनी 
देता आदेश आम्ही तयांसी
 
काय असे तयांची बिशाद
होतील मागेपुढती सोडून रांग  

आमच्या नुसत्या एका इशाऱ्यावर 
येतील सारे यमकात आपोआप 

शब्दप्रभूच असु जणू आम्ही 
वरदहस्त असे सरस्वतीचा आम्हावरी

मुक्ती

देऊ नकोस मज भगवंता मुक्ती
दे मजसी तव चरणांची भक्ती

नच दिलीस मज जरी सायुज्य मुक्ती
देशी मज भोग भोगावयाची शक्ती

जन्मोजन्मी देशी मज भोगांच्या राशी
विसावा देशी मज तव चरणांपाशी

विसर न व्हावा तुझा मज कधी
तुझ्यातच रमावा जीव जन्मोजन्मी 

....स्वामी खडकानंद

ख्वाईशे...

ख्वाईशे...
जिंदगी के साथ भी
जिंदगी के बाद भी

जिंदगी में हर ख्वाईश होती नही पूरी
हर ख्वाईश के साथ इक नई ख्वाईश है पन्पती

जिंदगी के सौ साल भी हो जाये पूरी
जीने के पल दो पल रह जाते है बाकी

लगता है ऐसा हो जाएगी पूरी हर ख्वाईश
हो जाये जिंदगी पूरी, अधुरी रह जाये ख्वाईश

हर ख्वाईश के बाद नई ख्वाईश
नही होती कभी पूरी हर ख्वाईश 

रह जाती है बाकी ख्वाईशे
जिंदगी के साथ भी
जिंदगी के बाद भी

वाटतं......

वाटतं कायमच रहावं स्वप्नांत
वाटत कधी न यावं सत्यात

वाटतं उतरतील का कधी सत्यात?
जी पाहिली स्वप्ने उषास्वप्नांत

वाटतं संपू नये कधीच नीशा
वाटतं येऊ नये कधी उषा

वाटतं येतां उषा, जाता नीशा
होईल पाहिल्या स्वप्नांची दशा

वाटतं स्वप्नीच रहावे स्वप्नीच रमावे
वाटतं स्वप्नीच जगावे स्वप्नीच मरावे

वाटतं कायमच रहावं स्वप्नात
वाटतं कधी न यावं सत्यात