Saturday, July 11, 2026

वैकुंठवासी श्रीकृष्णस्तु भगवान स्वयं

हे निर्गुण निराकार दिसे मज अंधकार 
हे करुणानिधान न दिसे मज तव रुप

असशी जरी तू निर्गुण निराकार 
निजभक्तासाठी होसी सगुण साकार 

दिसेना मज तव चर्तुभुज स्वरूप
शंख चक्र गदा पद्म धरिलीसे चर्तुहस्त

न दिसे तव गळा तुलसीमाळ कपाळी केशरी गंध 
का रूसलासी मजवर हे दिनानाथ 

वक्षस्थले नाना चिन्हे नसेलासे कासे पितांबर 
दिसेना दिनानाथा मज तव चरण

कृपाकरी या भक्तावर दूर करी अंधकार
देई मज चर्तुभूज स्वरूप दर्शन

दुर करी अंधकार मम चित्ताचा
प्रकाशित करी तेथे तव सगुणसाकार रूप

धन्य धन्य होईल मग हा सुनिल तव भक्त
वैकुंठवासी श्रीकृष्णस्तु भगवान स्वयं

No comments:

Post a Comment