Saturday, July 11, 2026

माऊलीचे वचन

आणि जेणें जेणें वेळें । घडती कर्में सकळें ।
तयांचीं तियें फळें । त्यजितु जाय ॥ १२८ ॥
वृक्ष कां वेली । लोटती फळें आलीं ।

माऊलीचे वचन ऐकले आम्ही तत्काळ
तैसेचे आम्ही त्यजिले कर्म फळास

ऐकले जे जे सत्संगी ते ते
त्यजिले तत्काळ
ना ठेविले साठविले मनामाजी

किंबहुना या काने ऐकले त्या कानी तजिले 
अंगी  लावण्याचे व्यर्थ न केले सायास

जे जे आपण सांगितले आणले आचरणात 
कैसे गेले दिन जांभया देण्यात
न कळले
खाता प्रसाद तिन्ही त्रिकाळ

जैसे ओततां खडकी पाणी
कोरडाच राही न झिरपे पाणी

जे जे उपदेशिले या खडका आपण
कोरडाची राहिला अंर्तबाह्य
हा खडकानंद

व्यर्थची केला आटापिटा सत्संगी येण्याचा
करुनी कृपा आम्हीवरी द्यावी माफी पामरा 

आहात जाणते महाराज तुम्ही 
काय वर्णु मी आपली महती

जे जे रचियले शब्दांचे बुडबुडे
अर्पितो महाराज आपुले चरणी

…स्वामी खडकानंद

No comments:

Post a Comment