Tuesday, May 19, 2020

डर डर के क्यु जीना है।

डर डर के क्यु जीना है।
जीना है तो एक दिन सबको मरना है।

कोरोना से डरोना, रोज़ रोज़ क्यु रोना है।
मर मर के जीनेसे आजही मर जाना अच्छा है।

अब सब लोग आपको डरायेंगे।
हर कोई इम्युनिटी बढ़ानेको बोलेंगे।

कल तक जो बेचते थे मधुमेह की दवाईयॉं।
आज वोही बेचेंगे इम्युनिटीकी दवाईयॉं।

जीना यहाॅं अब तो मेहेंगा है।
मरना यहाॅं अब तो सस्ता है।

गाडी हो या हो घोडा हर चीजपर कोरोना है।
इंसान हो या वस्तु छुना इनको मना है।

जगपर छाया अब कोरोना है।
ये बस उसकी माया है।

रोज डर डरके जीने से
इक बार ही मरना अच्छा है।

अब तो सुमिरन करले...

पुछताछ करके घरसे निकला मैं प्रभु के धाम।
बड़ा सहज लगता था मुझको जपना प्रभु का नाम।

बीच रास्ते मिल गये मुझको बचपनके यार।
खेलकुदमें ऐसे उलझा, न साँझा प्रभु का नाम।

खेलकुदसे जब थका हार फिर निकला प्रभुके धाम
बीच रास्ते मोह लिया मोहे मोहनकी राधाने।

मोह माया में ऐसे जकड़ा गृहस्थीनें जैसे पकड़ा।
भुल गया मैं प्रभु का नाम, रास्ता प्रभु धाम का।

मदमोह से जब देर सवेर मैं जागा
द्वार खड़े देख यमदुतों का घेरा।

देर भयी फिर भी न समझा।
कठीन है मिलना धाम प्रभु का।

बड़ा सहज लगता था मुझको जपना नाम प्रभु का।
भटक गया कब मोहमायामें मैं ये समझ न पाया।

देर आये दुरुस्त आये, अब तो सुमिरन करले।
हे मन बावरे अब तो प्रभु का नाम स्मरले।

..... स्वामी खडकानंद

बहती धारा

ये ज़िंदगी है जैसे बहती धारा।
न है इसका कोई किनारा।

 ज़िंदगी यहाँ  ज़रा थमसी गयी है।
साॅंसे यहाँ ज़रा रुकसी गयी है।

ठैहरे है आज लम्हें कुछ ऐसे।
ठैहरे है आज हवॉं के झोंके जैसे।

ठहर नहीं सकती ये आस अपनी।
जब तक है ये साँस अपनी।

थमसी गयी है ये जीवन की धारा।
थमती नहीं है ये विचारों की धारा।

जीवन तो है एक बहती धारा।
न कभी रुकेगी न कभी थमेंगी।

दूर करी हे संकट अनंता...

घरा बैसोनिया सारे जन
वेळ हा कैसा जाता जाईना

कोणी पाही रामायण-महाभारत
कोणी लावी हा चित्रपट

कोणासी केवळ मनी मानसी चिंतन
तरी हा वेळ हा जाईना निरंतर

कोरोनाचा हा खेळ चाले जगभर
थांबले हे जग क्षणभर

सुनील म्हणे हे पाहवे ना डोळा
आता तरा तुज येवो दयाघना

नाडले हे जन जन सारे
तुजवीण अनंता कोण धावे

धाव धाव आता रे भगवंता
दूर करी हे संकट अनंता

Sunday, April 12, 2020

पण, त्यांचे काय?

तुम्ही आम्ही चार भिंतीत राहू सुरक्षित
पण, त्यांचे काय? ज्यांना क्षितीजाच्या भिंती अन् आभाळाचं छत

महिन्या दो महिन्याचं आपण भरून ठेवू रेशन
मग कितीही का वाढेना लाॅकडाऊनचे सेशन

सांगा पण गरिबांनी ते करावे काय
दात कोरन तरी भरतील का पोटं

पण अशी रोज रोज भरायला पोटं
दातांमध्ये तरी राहिलाय का अन्नाचा कण

आता दातांमधल्या किटाणूंची होत आहे उपासमार
कारण दातावरही मारायला उरला नाही अन्नाचा कण

तुम्ही आम्ही चार भिंतीत राहू सुरक्षित
पण, त्याचे काय? ज्यांना क्षितीजाच्या भिंती अन् आभाळाचं छत

कोण कुठला व्हायरस कोरोना...

काम, काम अन् काम नुसते काम
करतो आहे गेले पंधरा दिवस काम

काम, काम आहे भरपूर काम
पण माहित नाही त्याचा मिळणार कधी दाम

करून करून इतके अपार कष्ट
कुणास ठाऊक होईल का लक्ष्मी संतुष्ट

‘लाॅकडाऊन’च्या या जमान्यात थांबले रहाटगाडगे
पण भरायचे राहिल का हे पोटाचे खळगे

‘लाॅकडाऊन’ नंतर म्हणत, ‘पुन:श्र्च हरीॐ’
ऊभे राहू सारे जिद्दीनं

कोण कुठला व्हायरस कोरोना
हा आपल्या आधी का जन्मला

काल परवा अवतरलेला एवढासा जीव
सर्वांचा लागला आहे टांगणीला जीव

घरामध्येच राहू अन् सोशल डिस्टसिंग पाळू
मिळून सारेजण ह्या दैत्या पळवून लावू

कोरोनाचा हा खेळ....

घरा बैसोनिया सारे जन
वेळ हा कैसा जाता जाईना

कोणी पाही रामायण-महाभारत
कोणी लावी हा चित्रपट

कोणासी केवळ मनी मानसी चिंतन
तरी हा वेळ हा जाईना निरंतर

कोरोनाचा हा खेळ चाले जगभर
थांबले हे जग क्षणभर

सुनील म्हणे हे पाहवे ना डोळा
आता तरा तुज येवो दयाघना

नाडले हे जन जन सारे
तुजवीण अनंता कोण धावे

धाव धाव आता रे भगवंता
दूर करी हे संकट अनंता

मानवाविना सृष्टि

सृष्टिची अशी ही कल्पना
कशी करू तुझ्याविना मानवा

 असेल जरी येथे हे चराचर सारे
पण जर नसता तू व्यर्थ ते सारे

असतील येथे वृक्षवल्ली जरी
नसेल येथे तुजविण चैतन्य तरी

असताही येथे प्राणीजात अनेक
वाटेल तरी ही धरा कळाहीन

फिरुनी लक्ष चौऱ्यांशी योनी
अस्तित्वात येशी तू मानवरूपी

तरी दाखवशी माज ऐसा
ही सृष्टि माझी आहे दास ऐसा

तुजवीणही ती राहील रे अबाधित
नको समजूस तू स्वत:स भगवंत

‘जनता कर्फ्यू’

आज प्रथमच शहरांत आहे शांतता नीरव
दुकाने बंद, घरात सारे बंद, रस्ते सुनसान

कुत्र सुद्धा नाही म्हणतां रस्त्यांवर कुत्रीच फिरताहेत
निर्मनुष्य रस्त्यावर आहे चिटपाखरांचाच वावर

‘जनता कर्फ्यू’चे पालन करताहेत जन जे जागरूक
देशाचे आहेत हेच खरे आदर्श नागरिक

आता वाटते असे की, महिन्यातून एक दिवस
नेहमीच करावा साजरा ‘जनता कर्फ्यू’

आम्ही असावें कैसे

आम्ही असावें कैसे
ठेविले अनंते तैसे

न कशाचा धरावा मोह
चित्ती ते धरावे समाधान

सदैव वाहत असे ते नाक
सदा कोंडत असे तो श्वास

परी औषधी न ये कामास
भोग ते भोगणे विना सायास

आपुले आपण करावे ते कर्म
न धरावी फळाची आशा व्यर्थ

होईल तेची खरे जी इश्वरेच्छा
आपण न करावी कामेच्छा

जे जे होईल ते इष्ट
ते ते मानावे संतुष्ट

भार सारा, भिस्त सारी ती एक भगवंत
माझे हितअहीत पाहिल तो एक भगवंत

आता न आशा कशाची
न आता चिंता कशाची

असतां सदैव तो माझा पाठीराखा
’हाऊ आर यु’ ते सांगेल सखा

Thursday, February 20, 2020

अविस्मरणीय...

अविस्मरणीय असे काही क्षण
दु:खाचे, आनंदाचे काही क्षण

स्मृतीत राहतात कायमचे असे क्षण
विस्मृतीत जातात असे काही क्षण

क्षणोक्षणी आठवात राहतात काही क्षण
क्षणभंगुर असूनही भासत राहतात काही क्षण

आज आत्ता क्षणापूर्वी अनुभवलेले काही क्षण
क्षणोक्षणी जाणवते अनुभूतीचे भारलेपण

अनुभूती क्षणांपूर्ती की क्षणाक्षणांची अनुभूती
न भूतो न भविष्यती की क्षणिक वर्तमानाची पूर्ती

प्यार अपनासा

सर रखके किसीके कंधोंपर रोना है हमको
जिंदगीमें जो भी मिला खुशी या गम हमको

जताना है शुक्रिया हर किसीको जिसने
साथ दिया है हमको हर गम या खुशी सहने

उस हर इक शक्स का हूॅं मै शुक्रगुजार
जो जिंदगीके हर मोडपर साथ रहें हमार

हमही थे वो नादान कर बैठे उनसे किनारा
उम्र के हर मोडपर जो मिले थे हमनिसांर

जानें कहा, किन खयालोंमें थे हम ओझल
कब आ गये जिंदगीकें आखरीं पल दो पल

अब तो करूॅं मै सबसे किनारा किनारा
अपनोंसे जो मिला अपरंपार प्यार अपनासा

काळाचा महिमा...

जुने कागद, जुन्या फायली शोधताना
सापडत जातो भूतकाळही जुना

सापडलेला जुना जीर्ण कागद
आठवात आणतो जुने सारे दिवस

या कागदांच्या गठ्ठ्यांमध्ये हरवलेले दिसं
डोळ्यांपुढे उभे राहतात जसेच्या तसं

चालत आलों साऱ्या वाटा पुढे
वाटत होतं भूतकाळ केव्हाच सरला मागे

पण वळून जेव्हा वाटा परतात पून्हा
दत्त म्हणून उभारतो भूतकाळ पून्हा

वर्तमानात जगताना भूतकाळ घेतो पाठीवर
अन् भविष्याचे ओझे मात्र घेतो डोईवर

भूत, वर्तमान अन् भविष्य होते जेथे एक
त्या काळाच्या महिमेवर होतो मी नतमस्तक