नका करू कोणाचा इतुका द्वेष
कि होईल स्वतःच्या मनाला क्लेश
राग लोभ मोह मदमत्सर दूर ठेवा
मिळेल मग तुम्हासी प्रेमाचा मेवा
विद्वेष दूजांचा सर्वथा व्यर्थ
कळेल ना तुम्हा प्रेमाचा अर्थ
अर्थाचाही मग होईल अनर्थ
यत्न तुमचे सारे वर्चस्वाचे होतील व्यर्थ
नका करू कोणाचा इतुका द्वेष
होताल मग साऱ्यांच्या प्रेमाला पारखे
No comments:
Post a Comment