जागेपणी झोपलो
झोपेतही जागलो
ब्रह्मानंदी टाळी लागली आत्मानंदी टाळी लागली
उठता बैसता आळविला श्री हरी
स्वप्नातही दिसे तो श्री हरी
हरी संगे नित्य रमावे त्यासी मग नित्य भजावे
नित्यनेमे त्यासी जपावे
नियमामध्ये खंड पडलासे
ते मी सारे सोपविले हरीवरी
हरीच करतो आता माझ्यासाठी जप
Saturday, July 11, 2026
सारे सोपविले हरीवरी
विश्रांती
अंतरीची ज्योत
कधी कुणी ऐकला आहे स्वतःच्या हृदयाचा आवाज
दुःख
दिनानाथा करी मजवर कृपा
पानावरचे कोरलेले लिखित
हरीभक्त सुनील
थबकली जणू ती निमिषार्धात
मनसे मन की बॉंते…
ब्रेक
नका करू कोणाचा इतुका द्वेष
सुवर्ण महोत्सवी वास्तु म्हणे तथास्तु
वैकुंठवासी श्रीकृष्णस्तु भगवान स्वयं
माऊलीचे वचन
परत निघालो आता निजधामा
प्रवासी सुनील
नासमझ सुनील
मुझको मै समझ सकू इतनी मेरी समझ नही
अगर मुझको आप समझ सके तो मुझको समझाना
नफरत किसीसे करनी आती नही
प्यार किसीसे जताना जमतां नही
फितरत हमारी अगर आप जान सके तो मुझको समझाना
हमें किसीसे दुश्मनी नही, कोई हमार दोस्त नही
निभा सके यॉंरी किसीसे ये हमारी फितरत नही
अगर मुझे समझ सके तो मुझको भी समझाना
….नासमझ सुनील
ढगांची रांगोळी
ढगांची काढली कोणी आकाशी रांगोळी
केली कोणी उधळण सप्तरंगांची
सूर्यकिरणांचा पसरला मोरपिसारा आभाळी
तेज आले साऱ्या धरणीस
सरला सरला साऱ्या रातीचा तिमीर
पसरला पसरला प्रकाश दशदिशेस
जाग्या झाल्या साऱ्या दशदिशा
उजळला सारा आसमंत
आभाळ उतरू आले
आभाळ उतरले धरेवर
क्षितिज दिसेनासे जाहले
आकाश आणि धरतीचे मिलन जणू जाहले
कुठे वसुंधरा कुठे क्षितिज कळेनासे जाहले
दूर डोंगर शिखरावर आभाळ उतरू आले
आभाळाला जणू कवेत डोंगर घेते झाले
परतताना घराकडे
धुक्याची शाल, ढगांची चादर
जणू पांघरली धरतीमातेने
अस्ताचली जाता सुर्यनारायण
सुस्तावली दिसभराच्या श्रमाने धरणीमाता
संध्यासमयी श्रांत झाली सारी सृष्टी
परतताना घराकडे आली माझ्या दृष्टी
धुक्याची शाल, ढगांची चादर
धुक्याची शाल, ढगांची चादर
जणू पांघरली धरतीमातेने
उदयाचली येता सुर्यनारायण
उबेची आली तीस मायेची पाखर
सकाळच्या पारी जागी झाली सारी सृष्टी
पडाता घराबाहेर आली माझ्या दृष्टी
मैने देखा कल रात को क्या आपने देखा?
अपनी अपनी आँखोंसे देखलो इक बार
कुछ देख न सकों तो केई बात नही
आकाशमें छाये काले घनेरे बॉंदल
सुरज की रोशनी करदें आँखों को ओझल
जब बरसेंगी चंद पानींके बॅुंदे
हटेंगे काले घनेरे बॉंदल
हो जायेंगी आँखें सूरजकी रोशनीसे चकॉंचोंद
छट जायेगा घनेरा आंधियांरा
घबरानां नही देखकर उस दिव्य तेज को
जो आँखोंकी रोशनी को कर दे चकॉंचोंद
अब मुंदकर इकबार अपनी अपनी आँखें
झांकलो मनके अंदर अपने अपने
उस दिव्य प्रकाश को जान लो
अपनी अपनी दिव्य आंखोंसे
वोही है निर्गुण निराकार परमात्मा
जो है छाया हर और अंदर बाहर
जानलो उसको अपनी अपनी आँखोंसे मनकी
हो जाओगे भावविभोर दर्शनसे उसकी
मैने देखा कल रात को क्या आपने देखा?
…सदा उसे याद करनेवाले सुनील
क्यूँ हमसे बतियॉंते हो
क्यूँ हमको सताते हो
ढंगसे हमे सोने देते नही
संपनोंमे आके नींद हमार खुलवाते हो
हर क्षण हर पल साथ हमारे रहते हो
इक पल हमे अकेला छोडते न हो
हमारी तुम्हारी पहचान है जन्मोंसे
रहते हो सदा हमारे सॉंसोमें
इक पल हम सॉंस न ले
तो तुम इतना क्यूँ घबराते हो
ये सॉंसे भी तुम्हारीही आहें भरती है
अगर तुम न हो साथ मेरे हर सॉंस आखरी है
हे भगवन तुम्ही तो हरपल सताते हो
मनसे कभी ओझल होते नही
कहते हो मुझको तुम भुलाते हो
याद मेरी तुम कभी करते नही
याद उसको करते है जिसको हम भुलते है
याद तुमको क्या हम करे कभी तुम्हे भुले नही है
…सदा उसे याद करनेवाले सुनील
….लिखनेंवाले सुनील
पता नही कैसे लिखते है हम दो पंक्तीया
कहते लोग की लिखते हम कविता
कहते है मन की बॉंते लिखते है हम
पर पता नही मनमें आती कहॉंसे ये बॉंते
लिखनेवाले हाथ होते है हमार
लेकिन लिखानेवाले कौई और
इक दिन जरूर ऐसा आयेगा
जो भी लिखेंगे वो ब्रह्मवाक्य होगा
लिखते रहे लिखते रहे लिखतेही रहेंगे
जबतक हाथ चले तबतक लिखेंगे
चाहो आप लोग पढो या न पढों
भेजते रहेंगे या दो चार कलाम
….लिखनेंवाले सुनील
धावत येई नारायण हरी
कोणासाठी येतो गळ्यामध्ये हुंदका
कोणासाठी दाटून येतो कंठ माझा
कोणासाठी डोळ्यांमध्ये होते आसवांची दाटी
कोणासाठी होते ह्रदयात कणवाची दिठी
मी करतो मीच साऱ्या होतो कारण
कळत नाही मला त्याचा कार्यकारण भाव
असे होत असेल का नेहमी त्याचे
भक्तासाठी त्याच्या कंठी असेल का हुंदका
त्याचाही दाटून येत असेल का कंठ
होत असेल का भक्तासाठी नारायणाच्या डोळ्यांमध्ये आसवांची दाटी
ह्रदयात त्याच्याही होत असेल का कणवाची दिठी
भक्तासाठी सोडून वैकूंठाची गादी
धावत येई नारायण हरी
देव मोठा की भक्त मोठा?
सांगा मज सांगा कोण मोठा
देव मोठा की भक्त मोठा
दिसेल कधी मज ते हरीचरण
राही क्षणभरी उभा देवाचिया द्वारी
तरी ना होई समाधान मनीचे
भेटल कधी मज तो हरी नारायण
म्हणूनची वाटे भक्तासी देव तो मोठा
नसे भक्ताच्या मनी भक्तीचा मोठेपणा
देवासाठी तोच भक्त होई मोठा
धावूनी येई सत्वर भक्तासाठी दिनानाथा
करी उभा विटेवरी पुंडलिक हरी
युगे आठ्ठावीस वाट पाहे तो हरी
हरीसाठी मोठा जिवलग तो भक्त
व्याकूळ होई तो निज भक्तासाठी
भक्त प्रह्लादासाठी घेई नरसिंह रूप
स्तंभी प्रगटलासे भक्ताकारण
हिरण्यकश्यपू वधिला उदर विदारून
निजभक्तांसाठी धरीली नाना रूपं
जानाई घरी दळे दळण तोची
एकनाथा घरी पाणी भरी तोची
भक्तांकारण तू झालासी निर्गुणाचा सगुण
तुजसाठी असे मोठा भक्त
सांगा मज सांगा कोण मोठा
देव मोठा की भक्त मोठा
….अंतरी तुझाचा धावा करणारा सुनील
अनंतकोटी ब्रह्मांडातून फिरूनी आलो आम्ही
लक्ष चौऱ्यांशी योनी फिरूनी आलो आम्ही
तरी न कळला पार तुझा बा अनंता
सदासर्वदा साथ असुनी तुझी अनंता
शोधीयले आम्ही व्यर्थ तुवा यत्रतत्रसर्वत्र
परी नाही दिसलासी आम्हा यत्रतत्रसर्वत्र
विसरलासे काय तु आम्हा भक्ता दिनानाथा
विसरलो आम्ही शोधावया स्वअंतरी दिनानथा
आता तरी दावशीला का वाट निजभक्ता
अंतरी माझ्या प्रकाशीत व्हावे चैतन्य तुझे दिनानाथा
….अंतरी तुझाचा धावा करणारा सुनील
….अव्यक्त सुनील
मनात असते तेच व्यक्त होते
मनातली मळमळ नव्हे तळमळ व्यक्त होते
जसे हे सारे जगत अव्यक्तातून व्यक्त होते
तसेच काहीसे मनाच्या अव्यक्त कोपऱ्यातून शब्द व्यक्त होते
कोणासाठी चार शब्द जरी बरे नाही लिहिता आले
तरी कोणाविषयी चार शब्द बुरे न लिहीले जावे
शब्द असे यावे अगदी मनाच्या खोल तळामधून
इतरांच्या काळजीने तळमळीने कळवळून
शब्दा शब्दातून व्यक्त व्हावे असे मनाला वाटते
ते कधी सुचते कधी शब्दात बांधता येते
मनाच्या गाभाऱ्यातून गुंजावे मंत्र जसे
तैसेच गुंजावे रोज शब्द नवे नवे
शब्दातीत व्यक्त होणे शब्दांचे चांदणे
मनाच्या आकाशात प्रकाशमान व्हावे चांदणे
आंधारलेल्या वाटांवर मग प्रकाश यावा तसा
जसा पुनवेच्या चांदण्यांने प्रकाशतो आसमंत जसा
….अव्यक्त सुनील
….स्वतःच्या विश्वात रमणारा सुनील
हे विश्व माझे मी या विश्वाचा
मीच घडवितो मीच संहार करतो
सारे माझ्या मनाचेच खेळ
मीच जमवतो साऱ्याचा मेळ
मीच मांडतो नव्या नव्याने डाव
मीच मोडतो पुन्हा पुन्हा डाव
या विश्वाचा रचेता अन् संहारक मी
नाही या साऱ्या कारण दुसरा कोणी
असते का हो प्रत्यकाचे आपुले विश्व
त्याचे त्याचे असते आपल्या परिधीत फिरणं
जोवरी आहे चालू श्वास माझा
तोवरीच आहे का माझे माझे विश्व
का पुन्हा नव्याने होईल का नवे विश्व
नव्या परिधीत होईल का नवे विश्व
….स्वतःच्या विश्वात रमणारा सुनील
मधूरसाचे मोहळ
वेचावे शब्द न शब्द
कोरावे लेणे शब्दबद्ध
पेरावे शब्द न शब्द
तैसे उगवावे शब्द न शब्द
झरावा शब्दांतून पाझर
उचंबळावा शब्दांतून सागर
शब्द सागरांतून मेघांचा जागर
शब्दमेघांच्या गडगडातून शबदसरींचा पाझर
शब्दसरींतून वहावे कवितेचे ओहळ
शब्दांतूनीच साकारे मधूरसाचे मोहळ
लिहीण्यासाठी काय हवे
लिहीण्यासाठी काय हवे
हवे कागद अन् लेखणी
तरी लिहिता येईल का त्यावरी
हजार पानी ती कादंबरी
विचारांशिवाय उमटेल का त्यावरी
निदान एक तरी चारोळी
कितीही असो शाईने भरलेली लेखणी
कागदांवरी उमटेल का कवितांची लेणी
कागदांमागून कागद भरले
लेखणीने सारे काळेनिळे कोरले
विचारांशिवाय उमटतील का शब्द
रकान्यांमागून रकाने राहतील निशब्द
असूनही कागद अन् लेखणी
विचारांशिवाय राहतील कोरेच्या कोरे
केऱ्या मनात उमटतील विचार नवे
तेव्हाच होतील कागद शब्दालंकाराचे लेणे
आयुष्याची संध्याकाळ
ये आयुष्याची संध्याकाळ
आठवात येई निज काळ
घडून गेले जे भले बुरे
उभे राही स्वच्छ डोळ्यांपूढे
घडल्या असतील चुका अनेक
पण नीयत होती नेहमीच नेक
येवून गेले कितीएक जीवनात
लावून गेले माया जिव्हाळा मनी
तिन्ही सांजेला संध्या समयी
संदीप्रकाशी दिसतो जीवन प्रवास
हरवले गवसले जे जे ऐसे
खंत खेद अन् आनंद मनी न मावे
दिसतो मजला पैलतीर आता
न भिवती मज संध्याछाया आता