Thursday, October 14, 2021

ऐसा क्युँ होता है पता नहीं...

ऐसा क्युँ होता है पता नहीं
किसी के आँसु देखे जाते नहीं

ऐसा क्युँ होता है पता नहीं
किसी की हँसी देखी जाती नहीं

उस हँसी के पिछे छिपी सिसकी
उस हँसी से पहले सुनायी देती है

ऐसा क्युँ होता है पता नहीं
हालत बुरीं किसकी छिपी नहीं रहती

चाहे करलो कोशिश कितनीही
बुराई किसीकी सही नहीं जाती

हो कोई अपना या हो कोई पराया
दर्द हर किसीका लगता है अपनासा

ऐसा क्युँ होता है पता नहीं
हर कोई पराया अपनासा लगने लगता है

तोच खरा जगी संतसज्जन...

कुणाचं दु:ख, कुणाचं सुख
कोण लपवितो आपुले दु:ख

सुखासाठी कुणाच्या कुणी लपवितो आसु
लपवुनी दु:ख आणी कुणी चेहऱ्यावर हसु

बोलू नये म्हणे कधीच असत्य
सुखासाठी कुणाच्या का न बोलावे असत्य

उपाशी पोटी द्यावा तृप्तीचा ढेकर
पिऊनी या पाणी

भरावा पोटाचा तो घेर
जाणी जो आपुल्या जनांच्या मनीचा भाव

तोच खरा जगी संतसज्जन

शब्दों के साथ...

शब्दों के साथ जो मैं बैठा लिखने कविता
शब्दोंने कहा की तुम क्या लिखोगे कविता

हम ना होते अगर दिमागमें तुम्हांरे
कविता क्या लिखतें और क्या पढ़तें

अगर हम शब्दही सारें तुमसे मुँह मोड़ लेते
कहो तब तुम क्या कभी बोल भी पाते

सही है यही अगर न होता साथ शब्दों का
न हम बोलही पाते न लिख पाते कविता

कहते है कविता है भावनाओं का बंधन
मगर सच यही है कविता है शब्दों का गटबंधन

अगर सही नहीं होता यह गटबंधन
न होती कविता कभी भावनाओं का बंधन

जो बिखर जाते सारे शब्द इधर उधर
न जुड़ पाता सही भावनाओं का बंधन

बिखरे सारे शब्द बिखरे सारे भाव
बिखर गये जो मेरे सारे विचार

मज लागलीसे आस स्वामी दर्शनाची

मज लागलीसे आस स्वामी दर्शनाची
चुकलीसे आज मासिक वारी स्वामी दर्शनाची

धावा धावा सत्वर स्वामीराया आता
तुम्हीच या मज द्यावया दर्शन आता

स्वप्नी दिधले दर्शन नृसिंहदेवा
मंदिरी तुमच्या येतसे मी दर्शना

बंद झालीसे कवाडे तव मंदिराची आता
येथूनची घेतो तव दर्शन आता

उघडा कवाडे लवकर मंदिरांची आता
न सोसवे हा दूरावा आता
...तुझा एक भक्त

नात्यातली वीण

शब्दांतूनी न सांगता येतात नाती
मनामनातूनी व्यक्त होतात नाती

नाती रक्ताची, नाती मनामनांची
नात्यातूनी जमते वीण मनामनांची

कितीही जरी दूरावली शरीरे सारी
नाही तरी दूरावती मनामनांची नाती

सख्खी, चुलत वा असो मावस मामे
नात्या नात्यांना न द्यावी काही नामे

नामांमधूनी का कधी ओळखू येती नाती
मनांमधूनी का कधी पुसतात ही नाती.

तुमच्या आमच्या नात्यातली वीण कायम राहो घट्ट
हाच राहो मनामनांचा हट्ट

मी आणि माझे...



मी म्हणजे मी म्हणजे मी असतो
तुमचा माझा सेम असतो

माझ्याशिवाय मी, मी नसतो
माझ्याशिवाय माझा मी नसतो

मी, माझे माझे नि मी मी करतो
पण करता करविता तो असतो

मला वाटते माझे मी करतो
पण तो माझेकरवी तो करवितो

करता करविता असता तो
मी मात्र माझे माझे करतो

तुझे माझे माझे तुझे करताना
मी आणि माझे, माझे असते का?

मी आणि माझे...

रिकामं मन

असं म्हणतात रिकामं मन सैतानाचे घर
पण मला सांगा खरचं रिकामं असतं का मन

ते तर असतं विचारांनी नि विकारांनी भरलेलं भारलेलं
उद्याची चिंता अन् आजची काळजी यानं भरलेलं

मनामध्ये आपल्या असतात अनेकाअनेक विचार
मनामध्ये आपल्या असतात अनेकाअनेक विकार

विकारांवर स्वार मन होत का सैतानाचे घर
का विकारांवविना मन होतं देवाचं देवालय

आता हे ज्याचं त्यांनीच ठरवावं आपल मन
असावें कसं सैतानाचे घर की देवाचं देवालय

म्हणूनचं तर सांगा म्हणतो मी
असतं का रिकामं मन कधी

रिकाम्या माझ्या मनी एक विचार आला
सांगा तुम्हीच शब्दांमधे बांधण्या जमला का मला

प्रस्थान

जवळची नाती सारी दूरावती
दूरची नाती जवळ येती

सुटले सारे घरदार अन् सगेसोयरे
मोकळे झाले बंध सारे

होत्याचे ते नव्हते होता
कळीकाळाचे ही काळीज हले

तोडून क्षणात बंधपाश सारे
घडे जीवात्म्याचे प्रस्थान खरे

शब्दांचेच बुडबुडे...

 जिथे तिथे नुसते शब्दांचेच बुडबुडे
नाही कुठे दिसे  प्रेमाचे ओलावे

जिथे शब्दांनी शब्दांनी शब्द वाढता
तिथे तुटे संवाद मना मनांचा

जेथे जाहला माणूस माणूसकीस पारखा
तेथे न ये ओळखू आपला परका

भाव भावनांचे तुटती ते बंध
या साऱ्याचा नाही कुणा  गंध

शब्दां शब्दांत यावा प्रेमाचा ओलावा.
मग पोहचेल गंध तेथे भावनांचा

मी तुझा हा होईल आभास
मग त्या त्या श्रांतल्या जीवास

माणूस म्हणूनी द्या आधार माणसांस
माणूस म्हणूनी मानतील तुज माणसं
....मी एक माणूस

ठेविले अनंते तैसेची रहावे. चित्ती असो द्यावे समाधान !

कायासी करावी उद्याची चिंता 
भेटतील हितचिंतक धरावी आशा

गेले ते दिन दीन गेले
उरले ते सुदिनच उरले

मनी चिंता नसावी उगाच
भेटतील जन ते हितचिंतक

केले जे सत्कर्म पूर्वायुष्यी
ते येईल सत्वर फळासी

पैसा गाठी असो वा नसो
येतील कामासी आपुले ते जन

असो सूर्य उगवता वा मावळता
तेज तयाचे डोळे दिपवता

तळापावे तैसेच आपण उत्तरआयुष्या
मग जन्ममरणाची न राहील चिंता

टाळायचा असेल जर कोरोना....

 टाळायचा असेल जर कोरोना
बघा जमलं तर एक करा

श्वास तेव्हढा घेऊ नका
बंद नाक बंद तोंड ठेवून बघा

मोकळ्या हवेत फिरू नका
बंद घरात राहू नका

माणसां बिणसांत मिसळू नका
एकांतात आजिबात राहू नका

जमलं तर एवढ करून बघा
येईल ना कोरोना आसपास तुमच्या