Friday, May 7, 2021

व्यथा-वेदना

 कुणाची व्यथा कुणाची वेदना
शब्दांत मांडता होई कादंबरी-कथा

कुणाची व्यथा कुणाची वेदना
शब्दात गुंफता होई काव्य-कविता

वेदना ती शारीरी व्यथा ती मनाची
कोणास ती कळते कुणास न वळते ती

जावे ज्याचा वंशा त्यास ती कळावी
अन्यांस ती नच कळावी

ये खबर तो अबतक नही आयीं

ये खबर तो अबतक नही आयीं 
कॅन्सरपर हमने विजय पायी

लेकिन ये तो यकिन  है पक्का
हमने कॅन्सर के साथ जीना सिखा

ये खबर तो अबतक नही आयीं 
कोरोनापर हमने विजय पायी

लेकिन ये तो यकिन  है पक्का
कोरोना के साथ हमें जीना होगा

पहने हम हरदम मुखपट्टी
रखें हम हरदम एकदूॅंजेसे दूरी

कोरोना का क्या है रोना
कोरोनासे न हमको डरना

अगर रखें हम हमेंशा स्वच्छता पुरी
हो जायेगी अनायस कोरोनासे दुरी

है बात हम को समझनी इतनीसी
रहें सावधान, न करे अपनी मनमानी

तो क्या है हिम्मत कोरोना की
जो छिने जिंदगी हमसे हमारी

माझे न उरले काही माझे

माझे न उरले काही माझे
चित्र मित्र संगित न राहिले माझे

राहतील का तरी शब्द माझे
राहील का कुणाच्या ओठी गीत माझे

माझा न उरलो मी माझा
राहिन का मी कधी कुणाचा

कुणासाठी कशासाठी जीव माझा
श्र्वास श्र्वास अडला माझा

आता न मी उरलो माझा
जाहलो मी आता रामाचा

निशाचर जन

झोपेतूनी मी होई दचकून जागा
ऐकता त्या अपरात्री गीता

हा साऱ्या भ्रमणध्वनींचा ध्वनी 
ऐकू येई केव्हा कधी कुठेही

वाटे द्यावी जाऊनी एक कानखाली तयांच्या
रात्रीस खेळ चाले हा जागरणाचा 

झोपमोड ही असह्य होई
लागे ते दू:खायला डोकेही

ऐसे कैसे नसते या लोकांना भानही
दूजा जनांच्या डोकावती घरामधूनी

सांगू मी कोणास ही व्यथा वेदना
उरली नाही जनांस आता संवेदना

आता आहे हे नित्य झाले
रात्रीस दिस करणे

जाहले जणू निशाचर जन सारे
दिसरातीचे भान न आता उरले