कधी कधी घ्यावासा वाटतो आम्हाला ब्रेक
रोजच्या त्याच त्याच रूटीनमधून ब्रेक
कधी कधी एखाद नाटक सिनेमा
तर कधी कधी भेट एखाद्या हॉटेलला
देवा तुला घ्यावासा वाटत नाही का रे ब्रेक
भक्तांच्या तक्रारी त्याच त्याच
देवा तुला येत नाही का रे कंटाळा
त्याच त्याच भक्तीच्या माळा
घेतोस की रे तुही ब्रेक कल्पांता अंती
तुझ्या अनंत लीला थांबवतोस काही काळासाठी
सृष्टीची करतोस तु पुन्हा पुन्हा रचना
खेळ तुझा तुझ्या आनंदासाठी
आवरून घेतोस रचना साऱ्या सृष्टीची
घेतोस की रे तुही ब्रेक कधी कधी
…तुझा भक्त सुनील
No comments:
Post a Comment