Friday, August 23, 2019

यकिन...

खुदपर यकिन हो ना हो
पर खुदापर यकिन जरूर हो 

चाहे ते साथ दे या ना दे 
पार उसका साथ हरपल रहे 

राह में आये कीर्तनी कठीणाईयाँ 
सही राह मुझे वोही दिखाऍ 

निगहो में मंझिल नजर ना आयें 
फिर भी मंझिल तक वोही पहुंचाये

गर कदम चालनेमें हो जाये मजबूर 
वोही गोदमे उठाकर पार लगाये 

खुदपर यकिन हो ना हो
पर खुदापर यकिन जरूर हो 

कुछ मनकी बांते...

लिखी है हेमने कुछ मनकी बांते
कुछ सच्ची, कुछ अच्छी

लिखी है हेमने कुछ मनकी बांते
कुछ खट्टी, कुछ मिठी

लिखी है हेमने कुछ मनकी बांते
कुछ सही, कुछ गलत

लिखी है हेमने कुछ मनकी बांते
कुछ अपनी, कुछ अपनोंकी

लिखी है हेमने कुछ मनकी बांते
कुछ सापाने, कुछ हकीकत

लिखी है हेमने कुछ मनकी बांते .... 

Thursday, August 22, 2019

दर्शन

आला होता तो स्वप्नी माझीया
दिधले तयाने दर्शन मजला

बोलला नच तो नजसी काही
नुसतेच तयाने केले स्मित त्याने

परि भासले मज ते स्मित अर्थवाही
भाव तयाच्या नेत्रामधले, तेही अर्थवाही

तो बोलला इतुकेच मजसी
का शोधसी मंदिरी मजसी

मी वसतसे तव अंतरी
पहा डोकावूनी स्वअंतरी

दिसेन मी तूज तेथे
आलास जरी तू येथे

पाहशील मज तू कैसे
मूर्तित नच मी तव अंतरी

तो बोलला इतुकेच मजसी
ऐसे भासले मज स्मितामधूनी तयाच्या

शाळेचा पहिला दिवस...

तसा कोणालाच आठवत नाही शाळेचा पहिला दिवस।
जेव्हा होतो आईचा हात सोडून नव्या जगात प्रवेश।।

वर्ग नवा, मित्र नवे, सारेच असते नवे नवे।
कळण्याचे हे सारे नसते वय हेच खरे।।

हात सोडून आपला जेव्हा पाठी वळते आई।
भोकाड पसरून डोळ्यातून वाहू लागतो आश्रुंचा पूर।।

होते डोळ्यांमध्ये आसवांची दाटी, नजर शोधे माऊली कोठे।
याआधी कधीच सुटले नव्हते तिचे बोट, अन् तिची साऊली।।

शाळेचा पहिला दिवस सर्वांसाठी बहुतेक असतो असाच।
जो कधी नसतो स्मरणात, तरी मनातून जाता नाही जात।।

बोलविता धनी

मी का द्यावे या देहाकडे लक्ष
जर का तो होणार आहे नष्ट

येथे सारेच अश्वाशत, चंद्र सूर्य तारे
मी का धरावा मोह देहाचा मारे

होतील आज ना ऊद्या माझी गलितगात्र
मी का समजावे मज अजरअमर मात्र

या देहाचा बोलविता धनी वेगळाच कोणी
मज वाटे मीच माझा बोलतो वाणी

हा देहही त्याचा हे विचारही त्याचे
त्याचे त्याने ठरवावे जगवावे वा जागवावे

Saturday, August 10, 2019

हे असे का होते?

हे असे का होते, ते सांगता नच येते
एकमेकांच्या सहवासाची सवय होत जाते

तुझे ते आजूबाजूस असणे, ते सारखे वावरणे
मनाला बोचते की आवडते, ते समजेनासे होते

तू असलीस काय? अन् नसलीस काय?
फरक काही पडत नाय फरक काही पडत नाय

कारण, तुझी सय, तू असीलीस अन् नसलीस तरी
पण सरत नाय सरत नाय

उगाच स्वत:ला गुंतवण्याचे करावे नाटक
पण पहिल्याच प्रयोगात फसावे ते नाटक

तू तिथे अन् मी इथे दोघे दोन ध्रुवावर
पण तेथूनही दिसे उत्तरेला तो ध्रुव तारा

त्या ताऱ्याच्या मग अंधुक प्रकाशात
मज दिसे तव परतीच्या प्रकाशवाटा स्पष्ट

तूज साठीचे जगणे होते जेव्हा
तूजवीण जगणे, होते असह्य तेव्हा

तिमीरात प्रकाशातच्या वाटा बुडून जाती जेव्हा
एक तूझी तेज शलाका पुसून टाकी अंधार सारा

माझ्याच अस्तित्वाला जेव्हा लागते प्रश्र्नचिन्ह
तेव्हा अस्तित्वच तुझे होते उत्तर त्या प्रश्र्नचिन्हा

तूजवीण मी शुन्य, शुन्न्यात हरवून जातो
तूजसाठी मी शुन्न्यात नजर रोखून जातो

विरहात सुखाला येते किंमत सहवासाची
सहवासी असतां येते दू:खाला झालर सुखाची

मी होतो केव्हा माझा, माझेच मला ना आठवे
अस्तित्व ते माझे तूजवीण शुन्यवत ते भासे

विरहात तूझ्या ग साजणी, गाऊ किती मी विरहणी
भासतात ते दिन-राती मज युगे तूजवीण साजणी

आज काही अनयचा होता वेगळाच मूड....

आज काही अनयचा होता वेगळाच मूड
म्हणत होता सुनीलकाका आहेत माझे फ्रेंड

म्हणत होता सुनीलकाका  आवडतात खूप
गळाभेट अन् पाप्यांचा करत होता वर्षाव खूप

खेळता खेळता फूटबाॅल,  पडत होता गळा
मांडीवरून उठण्याचं घेत नव्हता नाव

शाळेतून म्हणे थेट येतो तुमच्या घरी
आजोळला देऊन टाकू आजपासून सूट्टी

आज काही अनयचा होता वेगळाच मूड....

अनय...

माझे हे बोलणे कवतुकाचे
संपेल ना कधीही हे बोल कवतुकाचे

लडिवाळ चाळे जैसे अनय बाळाचे
तैसेच माझे हे बोल कवतुकाचे

तैसा आहे हट्टी तो बाळ
परी ऐकी सारे जाता समजाऊ

त्यासवे खेळावे होऊनीया मूल
द्यावे तया स्वातंत्र्य करण्या मनीचे

रागे न भरावे कधीही त्या बाळा
कौतुके सहज समजवावे बाळा

अनय...
भलताच गोड आहे हो हा छोकरा!

सुनील काका

आठवणींची सरमिसळ ....

आज स्वप्नी पहाटे माझ्या  आल्या सासूबाई
कुठले घर, कुठले दार कळले नाही काई

छोटा मयूर, मोठा मयूर फरक कळला नाही
काळ वेळ साऱ्यांची सरमिसळ झाली ठाई

चहाऐवजी हातामधी आली डोसा अन् चटणी
वेळ जेव्हा आली पिण्याची पाणी

कळले मज तेव्हा आई नाहित त्या ठाई
तेव्हा मात्र गळा पडून मयूरच्या रडता जाग आली घाई

अजूनही स्मरणमधून जात नाही काही
आठवणींची सरमिसळ संपत नाही

....सुनील

अंजान...

कल क्या होगा किसको पता।
फिर भी जी अंजानेसे घबराता ।

जो भी होगा सही होगा अच्छाही होगा ।
उपरवालेने अपनेलिए कुछ अच्छाही सोचा होगा ।

जानकर भी अंजानेसे लगता है क्यूॅं डर।
भरौसा रख ए दिल
खूदपर और खूदापर।

जिसका कोई नही उसका
खूदा है।
जानकर भी ये दिल अंजान है।

माते तव मायेचे पारखे एक लेकरु ...

डॉक्टरांच्या भाषेत कार्डिआक आरेस्ट
आमच्या भाषेत मी नाही जा

इतुक्या वर्षांचीअहर्नीश सेवा
कधी न पडला कधी त्यात  खंड

आंजिओप्लास्टि, बायपास वा व्हॉल रिप्ल्समेंट
साऱ्यांना देऊन तोंड अखंड राहिली धड धड

जरी न उरली पूर्वीइतकी शक्ती
तरी राहिली धडधडीची उर्मी

आज अचानक कायासे घडले
की थांबून सारी ऊर्जा धडधडणे ते थांबले

आजून थोडेसे केले असते सायास
तर थांबला नसता येथला प्रवास

तव सहवासाची अविरत छाया
मिळाली असती आम्हा अविरत माया

माते तव मायेचे पारखे एक लेकरु ... सुनील
(.... सासूबाई सौ. चित्रा यार्दी यांच्या निधनानंतर लिहिलेली कविता (१३ जुलै २०१९))

आर्शिवाद ईच्छुक

खडकालाही कधी कधी पाझर फुटतो
लोकांना तो जिवंत झरा वाटतो

त्या पाण्याची ती अविट गोडी
भल्या भल्यांची तहान भागवी

मायेचा हा झरा वाहता अटेल ना कधीही
थांबला जरी पाऊस पाणी

भरभरून घ्याव्या घागरीवर घागरी साऱ्या
भर त्या ओहळाचा अटेल ना न्यारा

दूरूनही हा मायेचा पाझर ओला
करत राहील सर्वांना चिंब ओला

स्पर्श जरी आता दृश्य हातांचा झाला नाही डोईवरी
अदृश्य स्पर्श आर्शिवादाचा राहील सदैव डोईवरी

आर्शिवाद ईच्छुक
... सुनील
(.... सासूबाई सौ. चित्रा यार्दी यांच्या निधनानंतर लिहिलेली कविता (१३ जुलै २०१९))

नेहमीच जेष्ठ (शिष्ठ) जावई ..... सुनीलराव

मी टेकेन दारातल्याच खूर्चीवर...

आई म्हणतील, चहा टाकलाय, घेऊन जा

सत्तावीस वर्षांपूर्वीच्या चहाची चव काही न्यारीच

आताही मी टेकतो दारातल्याच सोफ्यावर
आणि आई चहा करा सांगतो हक्काने

पण, आता ही चहाची तलफ भागवेल कोण त्याच सोफ्यावर

दारावरची मी वाजवतां बेल उघडेल कोण दारा

नेहमीची ओळखीची हासरी नजर दिसेल का पून्हा

सासू-जावयाच्या या नात्याची सर येईल का अनुभवा पून्हा

मायेचा हा पान्हा झाला अदृश्य जरी खरा
तरी मनाच्या गाभाऱ्यातून
पूसला जाईल का खरा

सुनील म्हणे या नात्याला सर नाही कशाची
जन्मोजन्मी हे रेशीमबंध तुटणार नाहीत कधीही

नेहमीच जेष्ठ (शिष्ठ) जावई ..... सुनीलराव
.... सासूबाई सौ. चित्रा यार्दी यांच्या निधनानंतर लिहिलेली कविता (१३ जुलै २०१९)

युगे युगे मी तव सहचारी..


होतो मी भगवंता युगे युगे तव सहचारी।
तुजवीण मी नव्हतो मी तव दशावतारी।

तव मस्यावतारी, मी होतो तव सहचारी।
तव कूर्मावतरी, मी होतो मेरूचा रहवासी।

तव वारहावतारी, मी होतो तव उच्छवासी।
तव नारसिंहावतारी, मी होतो साक्षीसी

तव वामनावतारी, मी होतो तव दर्शनार्थी।
तव परशुरामावतारी, मी होतो प्रार्थनार्थी।

तव रामावतारी, मी होतो शरयुतीरी।
तव कृष्णावतारी, मी होतो गोप गोकुळी।

तव बुद्धावतारी, मी होतो तव चाकर महाली।
तव कलीवतारी, मी असेन  तव सहकारी।

तव हर अवतारी मीही अवतरेन अनेक रुपी।
तुच देशी मज आकार भुतली या देहरुपी।

मी तुजवीण कधी नव्हतो या भूतली
तूजवीण मी कधी न येईन या भूतली

पैसे टाकले की सगळं मिळतं?

पैसे टाकले की सगळं मिळतं
पुरणपोळी, शिरापुरी, बासुंदी सगळंच मिळतं

पण मिळेल कशी समाधानाची पावती
अन् मिळेल कशी आईच्या वात्सल्याची गोडी

पैसा टाकला की सगळंच मिळतं
गाडी, बंगाला ऐषोराम सगळंच मिळतं

पण सुख समाधान आनंद होईल द्विगुणीत?
पैशाला येईल का घामाचा सुगंध?

पैसा टाकला की हाॅटेलची रूम मिळेल ए.सी.
पण घरातल्या पंख्याखाली येणाऱ्या घामाची सर नाही

पैसा टाकल की सगळंच मिळतं
सुख समाधान आनंद
सगळंच विकत घेतां येतं?

परिचय

परिचय

कौन है हम, क्या है हमारा परिचय ।
इन्सान है या और कोई है हमारा परिचय ।

न जाने खूदसे कब होगा हमारा परिचय ।
औरोंसे माॅंगते फिरते है उनका परिचय ।

हो जायें चाहें सारे जहाॅं का परिचय
पर क्या हो सकेगा खूदका खूदसे परिचय।

भगवान का तो पता नही हो पाये परिचय ।
लेकिन जिंदगी रहते हो जाये खूद का खूदसे परिचय ।

प्रश्र्नचिन्ह...

प्रश्र्नचिन्ह...

जिथे लागतं अस्तित्वालाच माझ्या प्रश्र्नचिन्ह
तिथे अस्तित्वच माझं होत शुन्य

कायसे झालासे देह हा अवर्तिण
सायासे न कळे कारण

कारणांचा घेऊ जाता धांडोळा
येई जीवीसी शिणवटा

जाऊ वाटे शरण भगवंता
परी न दिसे तव चरण अनंता

तुच दावी मज वाट आता
न होई सहन तव विरह आता

तुझ्या अस्तित्वास लागेल मग प्रश्र्नचिन्ह
न दिसतां मज तव चरणचिन्ह

या साऱ्यावर ईलाज नाही माझ्याकडे

आताशा मला समजायला लागलयं हळूहळू ....
कि या साऱ्यावर ईलाज नाही माझ्याकडे

इतरां समजून घेणे नि विसरून जाणे
सोपे नाहीच वाटते तितके

मना मनांत दाटून येतां निराशा
मग काय करावी दुजांकडून अपेक्षा

मनामध्ये खदखदा ज्वालामुखी, स्फोट होईल त्याचा कधी
स्वत: बरोबर साऱ्या जगाला जाळील कधी

मी संतही नाही, अन् पंतही नाही
जगाच्या चुकांवर पांघरूण घालायला

मीच साऱ्या जगाला समजून घेण्याचा का घ्यावा ठेका
कधी तरी समोरच्याने सोडावा आपला हेका

इतरांच्याच मनासारखे वागून सारखं
जग म्हणतं हा करतो आपलेच खरं

आताशा मला समजायला लागलयं हळूहळू ....
कि या साऱ्यावर ईलाज नाही माझ्याकडे

पंढरीस जाता....

पंढरीस जाता जाहल्या आठवणी जाग्या
पांडूरंगाच्या मंदिरी केल्या   कित्येक वाऱ्या

चंद्रभागेमध्ये मारील्या डुबक्या कित्येक
जन्मजन्मांतरीची पापे वारीली अनेक

मामाच्या गावाला जाऊ या
रोजरोज पोळशिकरण खाऊ या

विठ्ठल हरी तो पंढरीचा उभा विटेवरी
हरी विठ्ठल तो पंढरीचा झाला वैकुंठवासी

रया गेलीसे वाटे साऱ्या पंढरीची
पांडूरंगही जणू गेलासे परतुनी वैकुंठी

फिरून यावे माघारी असे मज वाटे
पांडूरंग अन् हरी विठ्ठल बरवे

पंढरीस जाता आता सुख न ऊरले
 सुनील म्हणे आता पुन्हा नाही परतुन येणे