बायको,
३१ वर्षे सरली, भेटून एकमेकांस
काय घडलं या ३१ वर्षांमध्ये
म्हंटलं तर बरच काही घडलं
म्हंटलं तर बरच काही बिघडलं
घडलं ते चांगलच घडलं
अन् जे बिघडलं त्यानी काय बिघडलं
जोपर्यंत आहे आपली साथ
तोपर्यंत घडण्या बिघडण्यानी फरक नाही पडत
एक वास्तु आकारास आली
एकेक वस्तु जमा झाली
नवी नवी नाती घडत गेली
काही नाती पडद्याआड गेली
सुख-दुःखांचे प्रसंग जरी आले नि गेले
एकमेकांची साथ अशी अविरत राहो
३१व्या विवाह वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
…..सुनील
21/11/2023
