Wednesday, August 9, 2017
शब्द निश:ब्द
शब्दा शब्दातून व्यक्त
व्हावे
निश:ब्दातून अव्यक्त
रहावे
शब्देवीण वाचाळता व्यर्थ आहे
शब्दातून व्यक्तता अर्थ आहे
शब्द शब्द सार्थ आहे
शब्दातूनच अर्थ आहे
शब्दातून प्रेम सार्थ आहे
शब्दातून राग अनर्थ
आहे
शब्द शब्द देती आधार
शब्दावाचून सुटतो धीर
शब्द शब्दच सारे जोडती
अन् शब्दच सारे
तोडती
शेवटचा शब्द राम व्हावा
शेवट माझा नि:शब्द व्हावा
Friday, May 19, 2017
Saturday, April 29, 2017
Subscribe to:
Posts (Atom)



