कोणासाठी येतो गळ्यामध्ये हुंदका
कोणासाठी दाटून येतो कंठ माझा
कोणासाठी डोळ्यांमध्ये होते आसवांची दाटी
कोणासाठी होते ह्रदयात कणवाची दिठी
मी करतो मीच साऱ्या होतो कारण
कळत नाही मला त्याचा कार्यकारण भाव
असे होत असेल का नेहमी त्याचे
भक्तासाठी त्याच्या कंठी असेल का हुंदका
त्याचाही दाटून येत असेल का कंठ
होत असेल का भक्तासाठी नारायणाच्या डोळ्यांमध्ये आसवांची दाटी
ह्रदयात त्याच्याही होत असेल का कणवाची दिठी
भक्तासाठी सोडून वैकूंठाची गादी
धावत येई नारायण हरी
No comments:
Post a Comment