वृद्धत्व-जरापण शैशव जणू दुसरे
जणू पिता नव्हे पुत्र दुसरा झालासे
क्षणात दिसतां पलंगावरी घोरताना
क्षणात दिसतां स्वयंपाकघरी लोणीसाखर चोरतांना
किती नि कैसे ठेवावे लक्ष नकळे या गोड लिलांवर
नच अनुभव जरी आला मज शिशुपालनाचा
देती मजला सुखसंवेदना तयांच्या सहवासाची
मग मी खोटे खोटे रागे भरतो त्यावेळी
साखर गोड खाणे भारी रुचे मनाला
पदार्थामांजी साखरेचे दोन चमचे घालता
येतां जातां तरीही साखर तोंडी घालणे
बिस्कीटांचा डबा नित्य रिता होत जातसे
शितकपाटी जरी ठेवला पदार्थ लपवून
हातोहात तरी होतसे मुखार्पण
किती ठेवावे लक्ष त्या शिशुवर ऐसे होतसे
कितीएकदा द्यावे दोन धपाटे ऐसे मन होतसे
परी नच चुकले तुम्हा-आम्हा यातून जाणे
जाणून ऐसे त्याकडे काणाडोळा करितसे
ऐसे आम्हा घरी असती दोन बाळे
Saturday, March 26, 2022
वृद्धत्व-जरापण शैशव जणू दुसरे
शब्द
शब्द लिहावे
शब्द वाचावे
शब्द शब्द साठवावे
शब्दन् शब्द आठवावे
शब्दा शब्दातच रमावे
शब्द शब्दातच हरवावे
शब्दांसाठीच शब्द जगावे
शब्दांसाठीच शब्दही सहावे
शब्दबद्ध व्हावे भाव
भावबद्ध व्हावे शब्द
अनोळखी
आपलेच शब्द जेव्हा होतात आपल्यालाच अनोळखी
तेव्हा आपल्याच भावना. होतात आपल्यालाच अनोळखी
ओळखीचीच नाती जेव्हा अनोळखी होतात
नात्यामधली अंतर ही
तेव्हा वाढत जातात
हरवलेले शब्दही सापडत नाही परत
दूरावलेली नातीही जूळत नाही परत
मग मात्र सारे जगच होतं अनोळखी
आणि स्वत:च स्वत:ला होत जातो अनोळखी
हि हरवलेली स्वत:चीच ओळख
कुठल्याही शब्दांमधून परत नाही मिळत
कशासाठी, कोणासाठी
कशासाठी, कोणासाठी मर मर मरतो
रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करतो
जगामध्ये येण्याचे प्रयोजन कळले नाही
जगामध्ये जगण्याचे नियोजन वळले नाही
जगतां जगतां न कळे किती काळ सरला
जगण्याचा आटापीटा न कळे किती काळ उरला
सरला अन् उरला काळ पडद्याआड गेला
सरलेला न आकळला, उरलेला तरी आकळावा
सांगतो मी एक गोष्ट ऐका
सांगतो मी एक गोष्ट ऐका
जगण्यासाठी मज कधी न लागला पैका
प्रेम, माया, ममतेने भरली माझी झोळी
मी नेहमीच घेतली स्नेह, आपुलकीची गोळी
भले राहीली पैशाने फाटकी माझी झोळी
परी कधी रिती न राहीली समाधानाची झोळी
या समाधानाच्या झोळीने उजळून निघाली माझी झोपडी चंद्रमौळी
हरदिन होते मग साजरी दिवाळी
कायासी करू मी यत्न लक्ष्मी कृपेची
जगण्यासाठी जरी लागला पैसा
परी पैशासाठी कधी न जाहले जगणे
वेळोवेळी संकटसमयी पाठी उभा राहीला हरी
गरजेवेळी धावून आली ती हरीप्रिया
कधी न केले चिंतन त्या श्री लक्ष्मीचे
कधी न विसरलो ते हरीचरण
जेधवा जेधवा स्मरले त्या हरीला
तेधवा तेधवा तारले त्या हरीप्रियेने
मज न लागली ती आस लक्ष्मी दर्शनाची
मज आहे आस हरीदर्शनाची
हरी पाठी येईल ती हरीप्रिया
कायासी करू मी यत्न लक्ष्मी कृपेची
हरी येतां येईल ती पाठी तयाच्या ती हरीप्रिया
मग कायासी मज चिंता त्या लक्ष्मीकृपेची