Saturday, July 11, 2026

….अंतरी तुझाचा धावा करणारा सुनील

अनंतकोटी ब्रह्मांडातून फिरूनी आलो आम्ही 
लक्ष चौऱ्यांशी योनी फिरूनी आलो आम्ही

तरी न कळला पार तुझा बा अनंता
सदासर्वदा साथ असुनी तुझी अनंता

शोधीयले आम्ही व्यर्थ तुवा यत्रतत्रसर्वत्र
परी नाही दिसलासी आम्हा यत्रतत्रसर्वत्र

विसरलासे काय तु आम्हा भक्ता दिनानाथा
विसरलो आम्ही शोधावया स्वअंतरी दिनानथा

आता तरी दावशीला का वाट निजभक्ता
अंतरी माझ्या प्रकाशीत व्हावे चैतन्य तुझे दिनानाथा

….अंतरी तुझाचा धावा करणारा सुनील

No comments:

Post a Comment