Wednesday, December 13, 2023

परमात्म्याचे दर्शन...

मनमंदिराच्या गाभाऱ्यात न मूर्ति होती न प्रतिमा

मनाच्या गाभारऱ्यात भरला होता अंध:कार दशदिशा


डोळ्यापूढे चमकत होते सर्वत्र काजवे

उमजत नव्हता आदी कुठे अन् अंत कुठे


अंध:कारात चाचपडता सुटत होता धीर

समजत नव्हते मना सावरू कैसे, कैसा देऊ धीर


केली मग निरांजनी काळजाची वात

पेटवली त्यावरी मग आत्मज्योती


पेटताच मनाच्या गाभाऱ्यात आत्मज्योती

दृश्यमान झाल्या दशदिशा


कळो आले तेथे नव्हता कधी आपपर भाव

होता तेथे आत्मा नी परमात्मा सदा एकरूप


उगाच भटकत होतो दशदिशा दिस इतके

बंद करून मनाच्या गाभाऱ्याची कवाडे


आत्मस्वरूपाचा पडता तेथे तेजप्रकाश

मज परमात्म्याचे झाले दर्शन


…स्वामी खडकानंद

 09/03/2023

No comments:

Post a Comment