Wednesday, December 13, 2023

मोतीबिंदू शस्त्रक्रिया

होता डोळ्यावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया

आला डोळ्यावर काळा चष्मा

झाली सारी दुनिया कृष्णधवल

अंतरंगात माझ्या उजळले सप्तरंग


यासमयी नुरले मज काही काम

आता राहिले डोकावणे अंतरंगात


काही कळेना उगवला वा मावळला दिनकर

काही कळेना दिन कोणता, कोणती रात


जी होती माझी दुनिया रंगीन

काळ्या चष्म्याने झालीसे कृष्णधवल


त्रिमितीतील साऱ्या प्रतिमा झाल्या द्विमिती

RGB ज्या होत्या प्रतिमा झाल्या B&W


भिववती मजला संध्या छाया

हटेल कधी ही डोळ्यांपुढची कृष्णधवल माया

25/03/2023

No comments:

Post a Comment