शरीरावरच्या ह्या जखमा झाल्या जरी बऱ्या
शरीरावर व्रण राहतात कायमच्या खऱ्या
मनावरच्या जखमांच तसं नसत मात्र
खोलवर झालेल्या जखमा दिसत नाही मात्र
भळभळणाऱ्या या जखमांवर करता येत नाही मलमपट्टी
कायमच राहते ही जखम खोलवर ओली
घातलीच जरी कोणी प्रेमाची फुंकर
तरी राहतेच कुठे तरी ठसठस दडून खोलवर
चिरंजीव अभिमन्युच्या कपाळी जशी राहते भळभळती जखम
मनाची ही जखम चिरंजीव राहते तशी कायम
म्हणून म्हणतो देऊ-घेऊ नका कोणी या भळभळत्या जखमा
जमलं तर बघा मारून दुसऱ्यांच्या जखमांवर हळूच मारून फुंकर
झालीच असेल जर माझ्याकडून तुम्हास अशी काही जखम
तर जमलं तर करा मला माफ मारतो मी प्रेमाची फुंकर
….तुमच्या प्रेमाचा हक्कदार सुनील
22/10/2023
No comments:
Post a Comment