हवां स्वत:चा स्वत:वर विश्र्वास
तरच जिंकता येईल इतरांचा विश्र्वास
डळमळीत विश्र्वासावर मिळतील डळमळीत फळं
विश्र्वासाने पडतां पाऊल मिळतील मधूर फळं
विश्र्वास तर ठेवायलाच हवा स्वकतृत्वावर
तेव्हाच तर मिळेल यश सत्वर
अंधविश्र्वास नसवा स्वत:वर अन् देवावर
विश्र्वास हवा स्वबुद्धीवर अन् श्रद्धा देवावर
विश्र्वासाने उचलावे आत्मविश्र्वासी प्रत्येक पाऊल
मिळेल प्रत्येक पाऊला पाऊलावर नक्की यश
विश्र्वास जरासा इतरांवर ठेवावा
विश्र्वास इतरांस आपला वाटावा
विश्र्वासाने दूसऱ्याच्या खांद्यावर ठेवतां यावी मान
अविश्र्वासाने कापू नये कधी दूसऱ्याची मान
विश्र्वासाने द्यावा इतरांस मान
विश्र्वासाने घ्यावा इतरांकडून मान
विश्र्वासावरच तर चालते सारे जग
विश्र्वास नसतां उद्धवस्त सारे जग
म्हणून म्हणतो...
हवा स्वत:चा स्वत:वर विश्र्वास
तेव्हाच जिंकाल तुम्ही इतरांचा विश्र्वास
26/03/2022
No comments:
Post a Comment