हटली डोळ्यांपुढची कृष्णधवल माया
दिसू लागली डोळ्यांना रंगीत छाया
नव्याने मिळाली मज नवी दृष्टी
उजळून निघाली माझी सारी सृष्टी
डोळ्यांपूढचे हटले अंध:कार सारे
दृष्टापटलांवर उमटले चित्र नवे
काळोखून आले होते आकाश सारे
उजळल्या आता साऱ्या दशदिशा
मोतीबिंदूने होती झाली नजर. धूसर
शल्यचिकित्सकाच्या कृपे झाली नजर क्लिअर
25/03/2023
No comments:
Post a Comment