Wednesday, December 13, 2023

विचारी सुनील

लिहीण्यासाठी काय हवे?

कागद अन् लेखणी हवे?


मिळाले कागद अन् लेखणी जरी

लिहीता येईल का एक कादंबरी


मिळाले कागद अन् लेखणी जरी

लिहीता येईल का एक चारोळी तरी


मिळाले कागद अन् लेखणी जरी

विचारांशिवाय उमटेल का शब्दांची लडी


कितीही असो शाईने भरलेली लेखणी

उतरेल का कागदावर कवितेची लेणी


जरी कागदांमागून कागद भरले

लेखणीने केले जरी काळे निळे


विचारांशिवाय कागदामागून कागदावर 

उमटेल का एक तरी शब्दालंकार


असूनही जवळी कागद अन् लेखणी

राहतील सारे विचारांशिवाय कोरेच्या कोरे


कोऱ्या मनांत उमटतील विचार नवे जेव्हा

येईल कामी कागद अन् लेखणी तेव्हा


म्हणून म्हणतो लिहिण्यासाठी काय हवे

कागद लेखणी अन् विचारी मन हवे


….विचारी सुनील

10/09/2022

No comments:

Post a Comment