शब्द का मजवर रूसले
का भाव मनीचे लोपले
कळेना मनासी काव्य का थांबले
गीत गाऊ जाता ओठ का थबकले
ओठांत होते ते शब्द जे
ओठांतल्या ओठांत का आडले
गाऊं जाता गीत मनीचे
गीत न उमटले मनीमानसी
हरवले कुठे काव्य माझे
न कळले माझे मला
सापडले जर तुम्हां माझे गीत कुठे
आणूनी द्या मजला तुम्हीं गडे
15/01/2023
No comments:
Post a Comment