नातं तुझं नी माझं नातं
नातं शब्दातीत नातं
मी तुझा की तू माझा
न कळे जीवा पाड तुझा
हे नातं जन्मो जन्मीचे
की आत्मा परमात्म्याचे
परम दयाळू दिनानाथा
सांभाळीशी मज अनाथा
दिसेना मज तव अंत पार
जीवासी लागलासे घोर
तुच दाखव आता वाट
तुच ने जीवासी तारून
नातं तुझं नी माझं नातं
नातं शब्दातीत नातं
तुझाच रे मी अनंता
तुही माझाच रे अनंता
तुजवीण नाही कोणी माझा त्राता
धाव धाव रे आता अनंता
20/01/2023
No comments:
Post a Comment