Wednesday, December 13, 2023

….प्रवाहपतित सुनील

 होतो जरी मी प्रवाहपतीत

केला नी मी पोहण्याचा यत्न


गेलो मी प्रवाही वहात

गाठला न मी किनारा पोहत


प्रवाह होता कघी कधी जोर

होता कधी कधी तोही संथ


जरी न मी केला यत्न पोहण्याचा

तरी आली न वेळ कधी बुडण्याची 


होते जरी मी त्या प्रवाही पतित

त्याच प्रवाहाने दावला किनारा मज


होवूनही मी प्रवाही पतित

लाभला किनारा मज तो सहज


….प्रवाहपतित सुनील

03/05/2023

No comments:

Post a Comment