श्रीधर आहे तात माझे
धरीले मी चरण तयांचे
रया गेली सारी त्यांचेविणा
ना ऊरले जीवनी आता राम
राम तयांनी म्हणता मग
यत्न केला किती विसरण्याचा
ण साधले ते काही मना
अक्षय राहिल आशिर्वाद तयांचा
गरिमा तयांची राहिल तशीच
रजा जरी घेतली त्यांनी आमची
खेद न खंत करू आम्ही
डमरू त्याच्या किर्तीचा
करेल नाद दाही दीशा
रमेल ना मन कशात आता
…सुनील
प्रत्येक ओळीचे पहिले अक्षर
श्रीधर नारायण अगरखेडकर
14/09/2022
No comments:
Post a Comment