Wednesday, December 13, 2023

संध्या छाया

भिववती मजला संध्या छाया

करेल कोण मजवरती माया


झिजता झिजता मम काया

येईल कोण मज आधार दाया


राहतील का नाती तैसीच तेव्हा

येईल यमराजाची चाहूल जेव्हा


मनी उद्याचे भविष्य दिसती

डोळ्यात होई आसवांची दांटी


न कळे अज्ञ या जीवासी

दिनानाथा माया तुझी


भिववती मजला संध्या छाया

करेल कोण मजवरती माया

18/010/2022

No comments:

Post a Comment