आम्ही कधीच म्हणत नाही करू पुढच्या वर्षी वारी
आम्ही जन्मोजन्मी करतो भूलोकीची वारी
कधी मनुष्य, कधी प्राणी, कधी फुले झाड वेली
पण आमची कधीच चुकत नाही भूलोकीची वारी
कधीच नाही म्हणत ‘राम कृष्ण हरी’
तरी चुकत नाही भूलोकीची वारी
करू आम्ही मातपितरांची सेवा
पुंडलिकाप्रमाणे करू हरी विटेवर उभा
आम्ही कधीच म्हणत नाही करू पुढच्या वर्षी वारी
आम्ही जन्मोजन्मी करतो भूलोकीची वारी
हरीच करेल आम्हीसाठी युगे युगे भूलोकीची वारी
कायासी करू आम्ही पंढरीची वारी
No comments:
Post a Comment