Sunday, July 13, 2025

विसरू कैसे तुला विठूराया

विसरू कैसे तुला विठूराया
मंदिर तव येतसे तिन्ही त्रिकाळ

विसरू कैसे तुला विठूराया
जाता येता तव चरणी ठेवीला माथा

विसरू कैसे तुला विठूराया
खेळ खेळलो सभामंडपी तुझ्या

विसरू कैसे तुला विठूराया
कळसावरी खेळलो लपाछपी

विसरू कैसे तुला विठूराया
गरूड खांबा घातलीया मिठी

विसरू कैसे तुला विठूराया
माझ्या मायेचे आजोळ पंढरपूर

विसरू कैसे तुला विठूराया
देखियेले तुज प्रत्यक्ष डोळा

विसरू कैसे तुला विठूराया
आठवात येती ते दिन सारे

विसरू कैसे तुला विठूराया
या भक्ता विसरू नको देवराया

विसरेल कैसे तुला विठूराया
तव चरणी लीन तो सुनील 

No comments:

Post a Comment