Sunday, July 13, 2025

पंढरीची वारी

आम्ही केली दर वर्षी पंढरीची वारी
आम्ही केला मुक्काम हरी विठ्ठलाच्या घरी

माझ्या माय माऊलीचे माहेर ते पंढरी
तिथे नांदे तिची मायमाऊली बंधू सखा नी सखी

नित्य होतसे आमुचे तेथे जाणे येणे
परी कधी न कळले न वळले पंढरीचे महिमान

आम्ही जरी होतो हरी भक्तीचे अजाणते
विठुचरणी ठेवियेला माथा येता जाता

कळला नाही पंढरीच्या वारीचा महीमा
तरी कधी चुकली नाही पंढरीची वारी

हरी विठ्ठलच असे आमुचा मामा
त्याचे प्रेमा नाही काही उपमा

चंद्रभागेमजी केले स्नान ते नित्य
तेथेची भक्त पुंडलिकाचे जाहले दर्शन नित्य

विटेवरी केला उभा हरी
आम्हासाठी तो भक्त पुंडलिके

घडलीसे अनायास पंढरीची वारी
आता न राहिला पंढरीस विठ्ठल हरी

आता नाही जाणे येणे आमुचे
पुन्हा नाही पंढरीस परतुन येणे

घेतलासे आता निरोप पंढरीचा विठ्ठल हरि
परतलासे वैकुंठी आता विठ्ठल हरि

… हरी भक्त सुनील

No comments:

Post a Comment