Sunday, July 13, 2025

कोण म्हणे आम्ही भक्त पुंडलिक

कोण म्हणे आम्ही भक्त पुंडलिक
आम्ही तर फक्त स्वार्थाचे पाईक

युगे अठ्ठावीस केले उभे परब्रम्ह पुंडलिकाने चेपतां चरण मातापित्यांचे 
आम्हीसी नाही धीर अठ्ठावीस क्षणांचा चेपतां चरण मातपित्यांचे

कायासी देईल दर्शन तो परब्रम्ह आम्हा पामरांसी
इतुकी नाही आमुची थोर पुण्याई

आम्ही फक्त कर्तव्याचे पाईक
जमेल तेवढी करतो सेवा त्या पुण्यात्मांची


No comments:

Post a Comment