Sunday, July 13, 2025

सुशांताही आज शांत जाहली

आज एक शब्द निःशब्द जाहला
एक लेखणी विसावली

आता न कधी मिळतील कुणा
खास दिनी शब्द फुलांच्या माळा

जीची गात होती शब्द गाणी जीच्या शब्दात होते भाव सारे
जीवनाचा कळण्या अर्थ शब्दांस घालील आता कोण साद

ती एक फूलवेडी कळी आज कोमेजली
चाफ्याचा सुगंध आता दरवेळल कायासी

नामकरण वाढदिवस शुभविवाहाच्या शुभेच्छा
आता फक्त आठवणींचा उमाळा

इंद्रधनुचे रंग जाहले आज फिके
डोळ्यात येई मग आसवांची पिके

भास्कराचा अस्त जाहला 
सुशांताही आज शांत जाहली

श्रीमती सुशांता भास्कर देशपांडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो 

…. सुनील (1 JULY 2025)

No comments:

Post a Comment