Sunday, July 13, 2025

दशावतार स्तोत्र

दशावतार स्तोत्र

हे गणनायका गजानना प्रथम तुज वंदितो।
हे पार्वतीनंदना बुद्धीदाता कृपा मजवरी करावी।।१।।

हे सरस्वती विद्यादायीनी लेखणीत माझ्या विसावी ।
तुच घडवी स्तोत्ररचना मजकरवी॥२॥

आता वंदू गुरूराया स्वामी सत्यव्रततीर्था।
जयांचे आम्ही असू वंशज आभिमान सार्थ॥३॥

जयांनी घेतलीसे सांगलीस संजीवन समाधी कृष्णाकाठी
कृष्णातीरी असे ते मूलवृंदावन विष्णु घाटी॥४॥

मध्वपरंपरेचे जे असती श्री उत्तरादी मठाधीश।
जे देतील मजकारणे नित्य आशीश॥५॥

वेदतत्वाचे करूनी मंथन अर्थ सांगती विद्वजना।
इष्ट प्रदान  करती  भक्तजना॥६॥

स्वामी सत्यव्रततीर्थ असती कल्पवृक्ष।
जयांचे करतो मी दिनरात स्मरण॥७॥

मी पापी पामर काय वर्णू लीला तुझ्या दिनानाथा।
भक्ताकारणे धरिलेसी अनेक अवतार दिनानाथा॥८॥

वर्णन करण्या तुझी महती जिव्हा माझी थोटकी।
कायासी करावे मी यत्न ते फूकाफूकी॥९॥

सत्यव्रत मनुराजासी तुवा दिले वरदान।
प्रलयकाळी  वेद अन् जीवांचे करण्या रक्षण॥१०॥

तुवा धरीले ते मस्यरूप हे श्रीहरी।
चराचर सृष्टीचे केलेस रक्षण सत्ययुगी॥११॥

देव आणि दानवा केले  क्षीर सागर मंथन।
मंथनासी केली रवी पर्वत मंदार॥१२॥

सागरी स्थिर राहेना तो पर्वत मंथनी।
बुडू लागलासे तो पर्वत सागरी॥१३॥

देव दानवांच्या मदतीस धावून आला दिनानाथा।
कूर्मरूप करून धारण दिला आधार पर्वता तू दिनानाथा॥१४॥

काय वर्णू तुझी महती लेखणी माझी थिटी।
बा अनंता तुझ्या लिला अनंत असती॥१५॥

हिरण्याक्षे घेतला धरेचा ताबा गेला घेऊनी रसातळा।
करण्या पृथ्वीचा उद्धार हा हरी वरहरूपी अवतरला॥१६॥

हिरण्यकश्यपू करी राज्य आपूले त्रिभूवनी।
देवतांसी तो अजिंक्य ठरलासी॥१७॥

त्यासी ब्रम्हदेवे दिधले अमरपणाचे वरदान ।
तुवा वधीला तो असुर धरूनी रुप नरसिंह ॥१८॥

असूरांचा राजा बली करी देवतांसी परास्त।
प्रह्लादाचा तो वंशज तुवा उद्धारीला ॥१९॥

केलेसी पादाक्रांत धरूनीया वामनरूप लोक तिन्ही।
वधीला न तू आसूर ठेवूनी मस्तकी पाय लोटला पातळी॥

भृगुकुळात घेतलासी परशूराम रूपे अवतार।
क्षत्रिय मातले अतोनात तु केलासी संहार॥२१॥

अजिंक्य होती देवतांसी ते असूर।
जाहलासे धरेवर तयांचा भार॥२२॥

त्रेतायुगी घेतलासे श्रीहरींनी अवतार।
दशरथनंदन मर्यादा पुरूषोत्म श्रीराम॥२३॥

कौशल्यानंदन सीतापती रघुरायांनी
स्थापियले रामराज्य, असूर रावण वधुनी॥२४॥

द्वापार युगी वाढली ती असूरवृत्ती मानवांत।
पापांमुळे जाहली पृथ्वी दयनीय॥२५॥

श्रीकृष्ण रूपे घेऊनी पूर्णावतार धर्म स्थपाना केलीस।
युगेयुगे धर्म रक्षणासी अवतार घेईन दिधले तु वचन॥२६॥

कलियुगात मानवात वाढे कर्मकांड।
वेदांपासून जाहले दूर ते दानव॥२७॥

तुवा त्यांसी करून मोहीत बौद्ध रूपे ।
केलासी तू दानवांचा तो उद्धार॥२८॥

कलियुगात होईल सभ्यता अन् संस्कृती ही ध्वस्त।
घेईल हरी स्थापण्या धर्म कल्कीरूपे अवतार॥२९॥

शके १९४७ मंगळवार आषाढ शुद्ध त्रयोदशीस ।
ब्रह्ममुहूर्ती झाले साकार हे स्तोत्र॥३०॥

जळी स्थळी पाषाणी दिसे मज तव रूप।
डोळा झाकतां उघडता दिसे तव नरसिंहरूप॥३१॥

स्वप्नी दिले तुवा दर्शन जाहलो मी कृतार्थ ।
आता न राहिली मज चिंता कशाची दिनानाथ ॥३२॥

तु निर्गुण निराकार भक्तासाठी सगुण साकार होसी।
जे जे करती तुझी निज भक्ती त्यासी देसी अनुभूती॥३३॥

शके १९४७ बुधवार आषाढ शुद्ध चर्तुदशीस तिन्ही सांजे।
जाहले हे दशावतार स्तोत्र सुफळ संपूर्ण ॥३४॥

तुज नित्य वंदीतो हा पामर सुनील।
असू द्यावे नित्य या भक्तावर कृपेची पाखर॥३५॥

….स्वामी खडकानंद

No comments:

Post a Comment