Sunday, July 13, 2025

का आणि कशासाठी?

मला नेहमीच पडतो प्रश्न 
का आणि कशासाठी?

कशासाठी जन्म आपूला जन्म?
कशासाठी मरण आपूलं?

मी आणि माझ्यासाठी
का आणि कशासाठी

जगणं कोणांच कोणासाठी
मर मर मरणं कोणासाठी

सत्ता आणि संपत्तीचा हव्यास कशासाठी?
का धरावा हव्यास प्रसिद्धीसाठी?

सारे सारे काही इथेच राहणार
माझी आठवणही सारे विसरून जाणार

मग मी का झुरावे कोणासाठी
का रडावे मी कोणाच्या आठवणीसाठी

मी तरी आहे का माझा?
कशासाठी मी धरावा माझेपणा?

मला नेहमीच पडतो प्रश्न 
का आणि कशासाठी?

….मी कोण कुठला सुनील

No comments:

Post a Comment