Saturday, August 10, 2024

अव्यक्त

वाटे शब्दही न बोलावा, निशब्द व्हावे वाटे
वाटे मनीही न उच्चारावा शब्द, निशब्द व्हावे मना वाटे

वाटे व्यक्त न व्हावे शब्दांनी
वाटे अव्यक्त रहावे मन, शब्दाविणा

पण होईल का असं जोवरी असे मनी विचारांचा ओघ
थांबेल का ओठांवाटे शब्दांचा ओघ

जोवरी चालू असेल हा आपूला श्र्वास
श्र्वासां श्र्वासांतून उमटेल नीतनवा शब्द

शब्दातीत माझे भाव, शब्दातूनच होती व्यक्त
शब्दावाचून मीच होईन मग अव्यक्त

…अव्यक्त सुनील
२६ जुन २०२४

No comments:

Post a Comment