Saturday, August 10, 2024

तुज ठायी चित्त रहावे अनंता

तुज ठायी चित्त रहावे अनंता
मनी येवू द्यावा न विकार अनंता

ठायी ठायी तुझीच रे माया
अटू न द्यावी आम्हावरची तुझी माया

चित्त रहावे सदा तुझे चरणी
न यावा मनी संशय काही कारणी

तुजसाठी व्हावे माझे जगणे मरणे
गाता तुझे नाम माझी जिव्हा न शिणवे

हे अंनता तुच माझा पाठीराखा
तुजकडे न मी फरवावी पाठ

डोळे भर भरूनी पहावे तुझे रुप
तरीही न भरावे ते माझे चित्त

आता एकची मागणे अनंता
दर्शन द्यावे सत्वर या पामरा

तुज ठायी चित्त रहावे अनंता
मनी येवू द्यावा न विकार अनंता

तव दर्शनाभिलाशी
स्वामी खडकानंद !!!
४ ॲागस्ट २०२४

No comments:

Post a Comment