आले विष्णुदूत चार माझिया द्वारी
म्हणाले आलो नायवयासी तुज वैकुंठ धामी
म्हणाले आलो नायवयासी तुज वैकुंठ धामी
स्वये वाट पाही तेथे हरी भक्ताची नीज
म्हणती विष्णुदूत निघूया सत्वर
म्हणती विष्णुदूत निघूया सत्वर
मी म्हणालो तयांसी नाही येणे मज वैकुंठ धामी
हिच धरा माझी आहे वैकुंठ धाम
हिच धरा माझी आहे वैकुंठ धाम
आहे येथे उभा हरी ठेवूनी कर कटेवरी
युगे आठ्ठावीस भक्त पुंडलिकासाठी
युगे आठ्ठावीस भक्त पुंडलिकासाठी
असता येथेची वैकुंठ का मी येऊ सत्वर
विष्णुदूतांनो जा सांगा हरीसी नाही संपली युगे आठ्ठावीस अजूनी
विष्णुदूतांनो जा सांगा हरीसी नाही संपली युगे आठ्ठावीस अजूनी
येणे कारणे नाही मज वैकुंठाची आस
मज ती आस येथेच हरी दर्शनाची
मज ती आस येथेच हरी दर्शनाची
….हरी दर्शाभिलाषी सुनील
३ जुलै २०२४
३ जुलै २०२४
No comments:
Post a Comment