Saturday, August 10, 2024

नामाविण सारे व्यर्थ आहे

नामाविण सारे व्यर्थ आहे
नामची सर्व साधन आहे

घेता नाम मुखी सदा
हरील हरी वेदना सदा

चिंता जाळी दिनरात चित्ता
घेता नाम सदा मिटतील सर्व चिंता

उठता बैसता आळवावे हरी नाम
नाही लागत तयासी काही दाम

विसरूनी सारे भान गावे अनंता
भेटेल याच देही याच डोळी तो अनंता

श्री लक्ष्मी-नृसिंह नमो नमः।
श्री स्वामी सत्यव्रततीर्थ गुरूभ्यो नमः।
४ ॲागस्ट २०२४

No comments:

Post a Comment