गावे का मी माझे माझेच गाणे
माझे माझ्याच स्वरात व्हावे गाणे
सुरही माझे शब्दही माझा
माझाच आवाज गुंजत जावा
बहार यावी या गीताला
जेव्हा आवाज आतून यावा
तालासुरात व्हावी शब्दांची आंदोलने
कानांनीही मग तृप्त व्हावे या स्पंदने
साद कुणाला घालु जाता
साद कुणाची यावी काना
स्वर सतारीचे गुंजता आसमंती
भान हरावे या जीवाचे
माझे गाणे, माझे माझेच गाणे
गाण्यातून उमटावे बोलणे माझे
कुणासाठीही न गीत रचावे
कुणासही जरी ते न रुचावे
माझ्याच ह्रदयी ते वसावे
माझ्यासाठी ते अनमोल असावे
माझे, माझेच गाणे गावे का मी
सत्वर आता मज सांगा तुम्ही कोणी
गाण्यास आतूर सुनील
९ मार्च २०२४
No comments:
Post a Comment