साऱ्या जगाला भेटून झालं
पण स्वतः स्वतःहाला भेटायचं राहून गेलं
पण स्वतः स्वतःहाला भेटायचं राहून गेलं
कोण चिडकं कोण रडकं
इत्यंभूत माहित झालं
पण स्वतः स्वतःहाला भेटायचं राहून गेलं
तो अगदीच कोरडा सर्वांपासून तुटलेलां
तो अगदीच कोरडा सर्वांपासून तुटलेलां
पण स्वतः स्वतःहाला भेटायचं राहून गेलं
तो म्हणजे अगदी देवमाणूस, देवासारखा भेटला
तो म्हणजे अगदी देवमाणूस, देवासारखा भेटला
पण स्वतःहातला माणूस भेटायचा राहून गेला
कितीएक आले नी कितीएक गेले
कितीएक आले नी कितीएक गेले
काळाच्या पडद्या आड सारे दडले
काळाच्या ओघात साऱ्यांची खरी ओळख राहून गेली
काळाच्या ओघात साऱ्यांची खरी ओळख राहून गेली
मनानेच करून घेतलेली चुकीची ओळख स्मरणात राहून गेली.
जगाला ओळखल्याचा आर्विभाव हवेतच विरून गेला
जगाला ओळखल्याचा आर्विभाव हवेतच विरून गेला
सत्य हेच खरं कधी स्वतःच स्वतःला ओळखू नाही शकलो
जगाला ओळखण्याची माझी काय पात्रता
जगाला ओळखण्याची माझी काय पात्रता
तुम्ही तरी सांगा मला माझी काय पात्रता
कसाही जरी असलो मी तुमच्या लेखी
कसाही जरी असलो मी तुमच्या लेखी
ओळखपाळख आपली राहू दे कायमची
….तुमच्यासाठी एक अनोळखी सुनील
२६ मे २०२४
….तुमच्यासाठी एक अनोळखी सुनील
२६ मे २०२४
No comments:
Post a Comment