Sunday, January 10, 2021

तव चरणी साकडे

 देवा विठूराया तुझ्या चरणांवर मस्तक ठेवाया वाटते भिती आता
न जाणो मुर्तितही असायाचा तो कोरोना आता

करतो मी आता तुझ्या अमुर्त रूपाची आराधना
दुरूनीचा करतो मी तव चरण वंदना

नित्य विठ्ठल नाम जपाची ही वारी राहिल अखंड
जरी पडलासे वार्षिक पायी वारीत खंड

असू दे देवा लक्ष, लक्ष लक्ष लेकरांकडे
राहू दे देवा कोरोना तो दूर हेच तव चरणी साकडे

No comments:

Post a Comment