Friday, May 7, 2021

निशाचर जन

झोपेतूनी मी होई दचकून जागा
ऐकता त्या अपरात्री गीता

हा साऱ्या भ्रमणध्वनींचा ध्वनी 
ऐकू येई केव्हा कधी कुठेही

वाटे द्यावी जाऊनी एक कानखाली तयांच्या
रात्रीस खेळ चाले हा जागरणाचा 

झोपमोड ही असह्य होई
लागे ते दू:खायला डोकेही

ऐसे कैसे नसते या लोकांना भानही
दूजा जनांच्या डोकावती घरामधूनी

सांगू मी कोणास ही व्यथा वेदना
उरली नाही जनांस आता संवेदना

आता आहे हे नित्य झाले
रात्रीस दिस करणे

जाहले जणू निशाचर जन सारे
दिसरातीचे भान न आता उरले

No comments:

Post a Comment