Sunday, January 10, 2021

सगळेच कोरे...

तसे असतात सगळेच कागद कोरे
पण चित्रकाराला त्यावर चित्र दिसते
 
तसे असतात सगळेच कागद कोरे
पण रंगाऱ्याला त्यावर इंद्रधनू दिसते
 
तसे असतात सगळेच कागद कोरे
पण लेखकाला त्यावर कादंबरी दिसते
 
तसे असते सगळ्यांचेच आयुष्य कोरे
पण कुणाकुणा त्यात नात्यांची वीण दिसते
 
तसे असते सगळ्यांचेच आयुष्य कोरे
पण कुणाकुणा ओल्या प्रेमाची खूण दिसते
 
तसे असते सगळ्यांचेच आयुष्य कोरे
पण कुणाकुणा भावनांची खाण दिसते
 
तसे असते सगळ्यांचेच आयुष्य कोरे
पण कुणाकुणा दू:ख्खाची लकेर दिसते
 
तसे असते सगळ्यांचेच आयुष्य कोरे
पण कुणाकुणा हरवल्या गवसल्याची आच असते
 
तसे असते सगळ्यांचेच आयुष्य कोरे
पण कुणाकुणा खळखळत्या ओहळाची साद  दिसते
 
तसे असते सगळ्यांचेच आयुष्य कोरे
पण कुणाकुणा संथ वाहत्या नदीची लय दिसते
 
तसे असते सगळ्यांचेच आयुष्य कोरे
पण कुणाकुणा धीरगंभीर सागराची गाज दिसते
 
तसे असतात सगळेच कागद कोरे...
 
तसे असते सगळ्यांचेच आयुष्य कोरे...


No comments:

Post a Comment