Sunday, January 10, 2021

माणूस जणू माणूसकीला झाला पारखा

माणूस जणू माणूसकीला झाला पारखा
नेहमीसारखी गळाभेट आता विसरा

मनामध्ये प्रत्येकाच्या उरली आहे संसर्गाची भिती
म्हणूनच झाली आहे मनांमधूनी माणूसकीची क्षती

नात्यामधल्या ओलाव्याला आता उरली नाही ओढ
म्हणूनच झाली आहेत एकमेंका घराची कवाडे बंद

आताही आहे कुत्र्यामांजरांना माजघरात प्रवेश
पोस्टमन, मोलकरणींना फाटका बाहेर रामराम

कारणांशिवाय भटकंतीला आता बसलाहे चाप
कारणांसाठीही भटकताना आता वाढतोय रक्तचाप

सुर्य, चंद्र, तारे नित्य उगवतात सारे
निसर्गाचा हा नित्यक्रम विसरू नका मारे

घरांच्या भिंती चार झाल्या सार्यांनाच प्याऱ्या
घरांमध्येच दडले तेही ज्यांचे घरात ठरत नव्हते पाय

दिनरात आता आहे प्रियजनांचा सहवास
दीन दिस येता नाही प्रियजनांचा सहवास

सोडून एकदिनी प्रियजनांना जाणे आहे नक्की
पण त्यापूर्वी न व्हावे विरहाग्निने व्याकूळ नक्की

No comments:

Post a Comment