भेटलो जेधवा जेधवा तुजला माते मन हर्ष भरले
नच कळले तुज जाऊनी वर्ष कधी हे सरले
नच कळले तुज जाऊनी वर्ष कधी हे सरले
दरवळतो अजुनी मनामधे तव स्मृतिगंध
नजरेपुढे अजुनी तरळते तव चित्र
विसरेन न मी कधीही तव स्मृतिगंधा
दिधलीस तू मजला मम प्रिया तव छाया
दिधलीस तू मजला मम प्रिया तव छाया
केलास बैसुनी कैकारव अंगणीच्या फांदी
वदलो तव मी नकोस करू चिंता लेकरांची
वदलो तव मी नकोस करू चिंता लेकरांची
ऐकून गुज माझे तत्क्षणी उडालीस ग पक्षिणी
आज आहे ग माते तुझी ती बरसी
आज आहे ग माते तुझी ती बरसी
जरी न राहिले तव अस्तित्व ते शरिरी
तरी राहील तव अस्तित्व स्मृतित ते अशरिरी
तरी राहील तव अस्तित्व स्मृतित ते अशरिरी
सासुबाई कै.सौ.चित्रा यार्दि यांचे प्रथम पुण्यस्मरण
No comments:
Post a Comment