Sunday, January 10, 2021

आली तोंड झाकून फिरण्याची वेळा

 कितीएक ती केलीस पाापे हे मानवा
आज तूजवर आली तोंड झाकून फिरण्याची वेळा

क्षुद्र तू  किती मानवा या सृष्टीच्या पसारी
क्षुद्र तो इवलासा जिवाणू तूज न आवरी 

चंद्रावरच्या वस्तीच्या तू भले मारल्या बाता
धरेवरच्या तव वस्तीच्या आक्षंका आता

निर्मिण्यास निघाला तू मानवा प्रतिसृष्टि
नाही तूजला संकटा ओळखण्याची दूरदृष्टी

No comments:

Post a Comment