मज लागलीसे आस स्वामी दर्शनाची
चुकलीसे आज मासिक वारी स्वामी दर्शनाची
धावा धावा सत्वर स्वामीराया आता
तुम्हीच या मज द्यावया दर्शन आता
स्वप्नी दिधले दर्शन नृसिंहदेवा
मंदिरी तुमच्या येतसे मी दर्शना
बंद झालीसे कवाडे तव मंदिराची आता
येथूनची घेतो तव दर्शन आता
उघडा कवाडे लवकर मंदिरांची आता
न सोसवे हा दूरावा आता
...तुझा एक भक्त
No comments:
Post a Comment