कायासी करावी उद्याची चिंता
भेटतील हितचिंतक धरावी आशा
गेले ते दिन दीन गेले
उरले ते सुदिनच उरले
मनी चिंता नसावी उगाच
भेटतील जन ते हितचिंतक
केले जे सत्कर्म पूर्वायुष्यी
ते येईल सत्वर फळासी
पैसा गाठी असो वा नसो
येतील कामासी आपुले ते जन
असो सूर्य उगवता वा मावळता
तेज तयाचे डोळे दिपवता
तळापावे तैसेच आपण उत्तरआयुष्या
मग जन्ममरणाची न राहील चिंता
No comments:
Post a Comment